मकरंद पाटील यांनी बांधले अजित पवारांचे तोरण

220
Adv

राष्ट्रवादीच्या फुटी नंतर शरद पवारांनी सातारा जिल्ह्याचा दौरा केला होता या दौऱ्यामध्ये वाई खंडाळा मतदार संघ ते कराड असा प्रवास आमदार मकरंद पाटील यांनी केला प्रवास करण्या अगोदर मकरंद पाटील यांनी आपल्या सोशल मीडियावर पोस्ट केली होती शरद पवार साहेब तुम्ही बांधाल तेच धोरण तुम्ही ठरवाल तेच धोरण अशा प्रकारची सोशल मीडिया पोस्ट करून आपला पाठिंबा शरद पवार यांना आहे असं जाहीर केले होते मात्र चार-पाच दिवसातच आमदार मकरंद पाटील यांनी शरद पवार यांचे बांधलेले तोरण उतरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे तोरण बांधले आहे

आमदार मकरंद पाटील नितीन पाटील यांनी किसनवीर कारखान्याच्या मदतीसाठी शरद पवार यांचे तोरण उतरवले असल्याचे बोलले जात असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे तोरण येणाऱ्या काळात कितपत लोकांना आकर्षित करून ठेवते याची उत्सुकता सातारा जिल्ह्याला लागली आहे

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून स्व.लक्ष्मणराव पाटील हे खा.शरद पवार यांच्यासोबत होते.आमच्या कुटुंबावर शरद पवारांनी भरभरून प्रेम केले व ताकद दिली आहे.स्व.लक्ष्मण तात्यांच्या माघारी वडीलकीचा हात साहेबांनी आमच्या डोक्यावर ठेवला.माझ्या सारख्या सामान्य कार्यकर्त्याला एवढं मोठं केलंत, प्रेम दिलंत,आपुलकी दिली,आदर दिला अशी भावनिक पोस्टही आमदार मकरंद पाटील यांनी सोशल मीडियावर चार दिवसांपूर्वी पोस्ट केली होती मात्र या सगळ्यापासून हरकत घेत आमदार पाटील यांनी आता अजित दादा यांच्या बरोबर राहण्याचा निर्णय घेतला आहे

सातारा जिल्ह्याचे राजकारण हे यशवंत विचारांचे राजकारण असून या विचारांपासून आम्ही दूर जाऊ शकत नाही. तत्वांशी व निष्ठा याबाबत कधीही तडजोड करू शकत नाही. त्यामुळे आम्ही शरद पवारांसोबत राहणार आहे. अशी ठाम भूमिका चार दिवसांपूर्वी आमदार मकरंद पाटील यांनी घेतली होती मात्र चार दिवसानंतरच आपली भूमिका बदलून मुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटात सामील होऊन आमदार मकरंद पाटील यांनी सर्वांनाच बुचकाळ्यात टाकल्याचे चित्र आहे

Adv