सोनवडे येथील महिला अत्याचार प्रकरणी आरोपींवर कडक कारवाई करा नीलम गोरे

154
Adv

सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील सोनवडी येथे सामूहिकपणे बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली. दि. १९ जुन रोजी मुलांना व पतीला डांबून ठेऊन पिडीत महिलेवर अत्याचार करण्यात आला. आरोपीची कोळसा भट्टी असून त्याच्या विरुद्ध दि. ७ जुलै २०२३ रोजी फलटण ग्रामीण पोलिस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आली. गुन्हा रजिस्टर क्र.१३५९/२०२३ असून कलम ३७६ नुसार गुन्हा दाखल झाला आहे. रायगड जिल्ह्यातील कातकरी समाजातील कुटुंब सोनवडी गावात कोळसा भट्टीवर काम करीत होते.अशा प्रकारच्या घटनेत असहाय्य महिलांचा गैरवापर करण्याचे कृत्य करतात हे माणूसकीला काळिमा फासणारे आहे. सदर आरोपींवर कडक कारवाई करावी अशी मागणी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांनी सातारा जिल्ह्याचे पोलीस प्रमुख समीर शेख यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे

सदर महिला व बालकल्याण विभागाकडून ठोस उपाय योजनांची कार्यवाही होणे अत्यंत गरजेचे आहे.जिल्हा स्तरावर महिला दक्षता कमिटी आहे.त्याप्रमाणे गाव पातळीवर दक्षता समितीची नेमणूक करावी. त्या अधिक सक्षम होण्यासाठी प्रशिक्षण द्यावे. तसेच एकूण पाच आरोपी होते असे पिडीत स्त्रीचे म्हणणे आहे. या पाच आरोपींना कसे ओळखता येईल याबाबतचा जो तपशील आहे तो तिला समुपदेशन करून नीट माहिती घेण्यात यावी. तिचा धीर वाढवून त्या बद्दलचे आणखी पुरावे कसे मिळतील यासाठी प्रयत्न करावेत जेणेकरून आरोपी पर्यंत पोचणे सोपे होऊ शकेल. यासंदर्भात डीवायएसपी
श्री राहुल धस व सिन्हा दुबे पंडीत, सामाजिक कार्यकर्त्यां यांच्याशी माझे तपशीलवार बोलणे झाले आहे. तशा तपासाबाबत सुचना दिल्या आहेत. वरील घटने संदर्भात खालील मागण्या आपणांस करण्यात येत आहेत.याबाबत संबंधित अधिकारी यांना योग्य आदेश देण्यात यावेत. असेही उपसभापती नीलम गोरे यांनी पत्राद्वारे कळविले आहे

१) या प्रकरणाचा सुत्रधार कोण आहेत तसेच ह्या घटनेचा छडा लागू नये पुरावा नष्ट करण्याचा प्रकार झालाय का, याबाबत पोलीसांनी अधिक तपास
करावा तसेच आरोपींवर आवश्यक कलमे लावून त्वरीत पुढील कारवाई करावी व लवकरात लवकर चार्जशीट दाखल करावे.
२) सर्व आरोपींना जामीन मिळणार नाही यासाठी चांगले विधीज्ञ देण्यात यावे.
३) आरोपी हसन लतीफ शेख याला अटक झाली असून उर्वरित आरोपी आरोपी फरार आहे, त्यांना लवकरात लवकर अटक करावी.
४) सदरील महिलेला मनोधैर्य योजने अंतर्गत मदतमिळण्यासाठी प्रयत्न करावा.वरील मागण्यांचा जरूर व्हावा. असेही जिल्हा पोलीस प्रमुख सदस्य त्यांना उपसभापती नीलम गोरे यांनी पत्राद्वारे कळवले आहे

Adv