
जावली विधानसभा मतदारसंघाचे भाजप महायुतीचे अधिकृत उमेदवार शिवेंद्रराजे भोसले यांच्या प्रचारार्थ सातारा शहरात विविध भागामध्ये पदयात्रांचा धडाका सुरु असून गुरुवारी सकाळी सातारा शहरातील शिवतीर्थ (पोवई नाका )-रामकृष्ण कॉलनी -अजिंक्य कॉलनी ( विशाल मेगा मार्ट )-कुबेर विनायक मंदिर -सिव्हिल हॉस्पिटल -देशमुख कॉलनी -मुथा कॉलनी -नगरपालिका शॉपिंग सेंटर -शिवाजी हौसिंग सोसायटी -रिमांड होम -जुना आरटीओ चौक – भाग्योदय डुप्लेक्स -गणेश कॉलनी – बनसोडे वस्ती अशी विराट पदयात्रा काढण्यात आली. पदयात्रेत शिवेंद्रराजेंच्या समवेत भाजप, राष्ट्रवादी अजित पवार गट, शिवसेना शिंदे गट, आरपीआयसह महायुतीतील सर्व घटकपक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, दोन्ही आघाड्यांचे सर्व आजी – माजी पदाधिकारी, आजी- माजी नगरसेवक, कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी झाले होते. ठिकठिकाणी पदयात्रेचे फटाक्यांच्या आतिषबाजीत आणि फुलांच्या वर्षावात स्वागत करण्यात आले. पदयात्रेत हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते व नागरिक सहभागी झाल्याने पदयात्रा मार्गाला यात्रेचे स्वरूप आले होते. शिवेंद्रराजेंनी पदयात्रा मार्गावरील प्रत्येक घरात जाऊन नागरिकांचे आशीर्वाद घेतले आणि त्यांच्याशी संवाद साधून विक्रमी मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले.
चौकट…….
शुक्रवार दि. १५ रोजी सकाळी ७ वाजता खणआळी, सम्राट चौक, ५०१ पाटी, देवी चौक, वेलणकर बोळ, गुरुवार परज, शेटे चौक, कमानी हौद, एलबीएस कॉलेज बोळ, मल्हार पेठ, ढोर गल्ली या मार्गावर पदयात्रा, सायंकाळी ६ वाजता फुटका तलाव, सायंकाळी ७.३० वाजता शाहूपुरी पोलीस स्टेशन आणि रात्री ८.३० वाजता भैरवनाथ मंदिर पटांगण करंजे नाका येथे कोपरा सभा होणार आहे. पदयात्रा व कोपरा सभेला सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.