प्राचार्य डॉ. मायप्पा बाबूराव वाघमोडे सेवानिवृत्त

308
Adv

प्राचार्य डॉ. मायप्पा बाबूराव वाघमोडे यांचा जन्म मु.पो. रेवलतात्र जत जि. सांगली येथील एका खेडेगावातश्री बाबूराव तातोबा वाघमोड यांच्या व सौ. पारूबाई बाबूराव वाघमोडे अत्यंत गरीब आर्थिक परिस्थिती अल्पभूधारक शेतक-याच्या घरी जन्म झाला. अंत्यत कष्टाने चिकाटीने जीवन जगत असताना आपल्या मुलाना चांगले शिक्षण घेण्यासाठी जे प्रयत्न करता येतील ते प्रयत्न करीत असत.
पहिली ते चौथी पर्यंत शिक्षण वाघमोडेवाडी खेताळ येथील शाळेत झाले तेथे कुलकर्णी गुरूजी शिकवत होते. त्याच्या घरी जळण पाणी आणून देण्याचे काम करून शिक्षण घेतलेत्या शाळेत श्री गावढे गुरूजी होते. त्यानी शिस्त, संयम, अभ्यास, प्रामाणिकपणा यासबंधी धडे दिले शिक्षणाचा पाया भक्कम झाला होता.

कला व वाणिज्य महाविद्यालय सातारा येथे राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख म्हणून चौदा वर्ष काम केले. त्यामुळे मला कै. आर. आर. (आबा) पाटील ग्राम विकास मंत्री होते. त्यांनी ग्राम स्वच्छता अभियान मध्ये परीक्षक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्यामुळे स्वच्छता अभियानामध्ये चांगले काम करता आले.

सातारा जिल्ह्याचे एस. पी. खोपडे साहेब होते त्यांनी पोलीस मित्रांसाठी कार्यशाळा सुरु केली होती, त्या कार्यशाळेचा मार्गदर्शक म्हणून संघी मिळाली “मानवी जीवन आणि बचत” या विषयावर सहा वर्ष काम करता आले. त्याच काळात शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथील अर्थशास्त अभ्यास मंडळावर निवड झालेली होती. त्या ठिकाणीपण नवीन अभयसक्रम प्रश्न पत्रिका स्वरूप मुक्त शिक्षण अभ्यासक्रम या मध्ये चांगला काम करता आले. काला व वाणिज्य महाविद्यालय उत्कृष्ट वाचक शिक्षक पुरस्कार हि मिळालेला आहे.

प्राध्यापक आणि प्राचार्य या कालावधीत काम करीत असताना माझ्या सौ. शारदा पत्नीची फार मदत झालेली आहे. मुलांचे शिक्षण त्यांचे संगोपन करण्याची पूर्ण जबाबदारी तिची होती. तसेच या विकासाच्या वाटेत तिचा खूप मोठा वाट आहे. राष्ट्रीय सेवा योजना शिबीर १० दिवसांचे चौदा वर्षे काम करीत असताना तेथे मुक्काम करावा लागत असे तरी तिने सर्व घरातील जबाबदारी स्वकारलेली होती. मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी तिची होती. माझ्या मुलांचे शिक्षण पण त्यांच्या आवडीनुसार झाले आहे. त्यांना कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होऊ दिलेली नाही. माझी मुले पण त्यांच्या कार्य क्षेत्रात वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत आहेत.

आई वडिलांचा आशीर्वाद पत्नीचे सहकार्य मित्राचे पाठबळ मुलांचे सहकार्य इतर मित्र परिवाराचे मार्गदर्शन शुभेच्छा यामुळे हा जीवनाचा परिपाठ पूर्ण झेलला आहे. आता नवीन निवृत्तीच्या क्षेत्रात प्रवेश करीत असल्याचे वाघमोडे यांनी सांगितले

Adv