महामार्गावरील खड्डे व विविध कामाकडे दूर्लक्ष केल्याने नाईलाज म्हणून आम्हाला आनेवाडी टोलनाका लोकशाहीच्या मार्गाने बंद पाडला आहे. पण आगामी काळात खळखट्याक आंदोलन होईल, असा इशारा भाजपा आमदार श्री छ शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिला.
रिलायन्स कंपनीच्या अधिकाऱ्यांनी 15 दिवसांत खड्डे भरून कारपेटींग करतो, असे सांगितले होते. मात्र, त्यांनी कोणतेही काम केलेले नाही. सुविधा नसल्याने टोल बंद करावा, अशी सातारकरांची इच्छा आहे.
त्यानुसार आम्ही हे आंदोलनाचे हत्यार उपसलेले आहे. टोलनाका सर्वांसाठी खुला केला आहे. आम्ही टोल वसुली करून देणार नाही. पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी ज्यापध्दतीने खेड शिवापूरचा टोलनाका बंद केला. तसा साताऱ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी प्रस्ताव पाठवून आनेवाडी टोलनाका बंद करावा
टोलनाक्यावर सुविधा नाहीत, रस्त्यात खड्डे पडले आहेत, नव्याने बांधलेले पुल तुटलेत, करोडो रूपयांची कामे करता व प्रत्यक्षात कामे निकृष्ठ दर्जाची होत आहेत. यासंदर्भात मी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे. आता अधिवेशन संपल्यावर मुख्यमंत्री बैठक घेणार आहेत. आम्ही आज लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन केले आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने आम्हाला विनंती केली होती,
मोडतोड किंवा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ देऊ नका. त्यामुळे आम्ही लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करत आहोत. यानंतरही रिलायन्स कंपनी आणि महामार्ग प्राधीकरणाने दुर्लक्ष केल्यास खळखट्याक आंदोलन केले जाईल असा इशारा त्यांनी दिला.