अन नगरसेवक अशोक मोने सातारा विकास आघाडी बरोबर

209
Adv

सातारा पालिकेची सभा नगराध्यक्ष माधवी कदम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली सभे दरम्यान नगरसेवक अशोक मोने हे सातारा विकास आघाडी च्या नगरसेवकांमध्ये बसल्याचे दिसून आले त्यावेळेस मोने सातारा विकास आघाडी च्या नगरसेवकांना बरोबर कसे काय अशी चर्चा सभा सुरु असताना पालिकेत रंगत होती

नगरसेवक खंदारे हे वॉर्डातील विविध कामांसाठी मुख्याधिकारी यांच्या भरसभेत पाया पडल्याने सगळेच आवुक झालेले दिसले

दरम्यान नगरसेवक बाळासाहेब खंदारे सभा सुरू असताना विविध नगरसेवकांच्या सहकार्यामुळे काम करण्यास शक्य होत आहे नगरसेवक अमोल मोहिते, नगरसेवक अशोक मोने, नगरसेवक अविनाश कदम व सातारा विकास आघाडीचे नगरसेवक दत्तात्रय बनकर यांची नाव घेत होते
 
दरम्यान पुढच्या मिटींगला भाऊसाहेब पाटील जर आले तर त्यांना काळे फासण्याचा इशारा नगरसेवक वसंत लेवे यांनी दिला ज्येष्ठ नगरसेवक मोने यांनी विविध मुद्द्यांवर आरोग्य विभागाचे कायगुडे साहेबांना खुलासा करण्यास सांगितले पण कायगुडे साहेब यांनी खुलासा मात्र केलाच नाही यावरून बराच गोंधळ माजला

नगरसेवकांनी अनेक प्रश्नांचा भडिमार करत प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. सानुग्रह अनुदानाची तरतूद कशातून केली?, शिक्षण मंडळाचे कार्यालय हलावण्याचे कारण काय?, मागासवर्गीय सेस फंडाची कामे का रखडवली जातात,बजेटमध्ये तरतूद केली आहे, सूचना कशी बदलली जाते, आदी मुद्यावरून नगरसेवकानी मुद्दे उपस्थित करून प्रशासनाला टार्गेट केल. 

नगराध्यक्ष माधवी कदम यांनी यावेळी कोणावर अन्याय होणार नाही असे निक्षून सांगितले. तर मुख्याधिकारी शंकर गोरे यांनी पालिका प्रशासनाची बाजू मांडली. नविआचे जेष्ठ नगरसेवक अशोक मोने यांनी बाळासाहेब खंदारे यांना जास्त भावनिक होऊ नका, सभागृहात कोणी कोणत्या जातीपातीचे नसते असा सल्ला दिला.

Adv