Saturday, April 25, 2026
spot_img
Home Satara District Satara City शिवकालीन ऐतिहासिक ओढा मुजवण्याचे काम करतोय पालिकेचा बांधकाम विभाग

शिवकालीन ऐतिहासिक ओढा मुजवण्याचे काम करतोय पालिकेचा बांधकाम विभाग

140
Adv

अदालत वाडा येथील शिवकालीन ओढा मुजवण्याचे काम सातारा पालिकेचा बांधकाम विभाग करत असल्याचे चित्र आहे

2011साली खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या माध्यमातून या शिवकालीन मानसी ओढा दुरुस्त करण्याची प्रक्रिया पार पडली होती संबंधित ठेकेदाराचे निधन झाले व ही प्रक्रिया थांबली सदरचा प्रस्ताव ओढ्याला धक्का न लावता त्याचे रुंदीकरण करण्याचा होता मात्र सध्याच्या भोंगळ कारभारामुळे ऐतिहासिक शिवकालीन ओढा बुजविण्याचे धैर्य बांधकाम विभागाने दाखवले आहे सातारा ही राजधानी म्हणून ओळखली जाते जर अशाप्रकार च्या शिवकालीन वस्तू जतन करणे येत नसतील तर ते विद्रुपीकरण करून राजधानी चे नाव मिटवण्याचे कामच एक प्रकारे हा बांधकाम विभाग करत असून येथील या कामासंदर्भात नागरिकांनी प्रचंड खेद व्यक्त केला असून बांधकामच्या पाटील किची बुद्धीची कीवच करावी लागेल

तत्कालीन उपनगराध्यक्ष दीपाली गोडसे यांच्या माध्यमातून हा प्रस्ताव सादर केला होता या शिवकालीन ओढ्याला प्रचंड इतिहास आहे हा इतिहासच मिटवण्याचे काम जर होत असेल तर हे सातारकरच दुर्दैव म्हणावे लागेल रुंदीकरण व्हावे ही इच्छा समस्त समर्थ मंदिर परिसरातील नागरिकांची आहे मात्र ओढ्याला धक्का न लावता हे रुंदीकरण झाल्यास अधिक आनंद होईल असे मत येथील नागरिकांनी सातारानामा शी बोलताना सांगितले

संबंधित इंजिनियर शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता या कामास िल्हाधिकार्‍यांची परवानगी आहे असे त्यांनी सांगितले परवानगी आहे की नाही ही हे तपासले जाईलच पण बांधकाम विभागाची किती बुद्धी आहे हे समसत समर्थ मंदिर परिसरातील नागरिकांनी बघितलीच

Adv