Saturday, April 25, 2026
spot_img
Home Satara District Satara City कामाठीपुर्‍यातील महिलांना मिळाला हक्काचा उद्योग शिलाई प्रशिक्षण पुर्ण करुन उद्योगाला सुरुवात; सौ....

कामाठीपुर्‍यातील महिलांना मिळाला हक्काचा उद्योग शिलाई प्रशिक्षण पुर्ण करुन उद्योगाला सुरुवात; सौ. वेदांतिकाराजेंचे मानले आभार

111
Adv

गोर- गरीब कुटूंबे आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी आणि या कुटूंबातील महिलांनी स्वत:च्या पायावर उभे राहण्याच्या उद्देशाने कामाठीपुरा येथील सावित्रीबाई ङ्गुले महिला बचत गटातील महिलांना राजमाता श्रीमंत छ. सुमित्राराजे भोसले बहुउद्देशीय स्वयं. महिला बचत गट ङ्गेडरेशनच्या अध्यक्षा श्रीमंत छ. सौ. वेदांतिकाराजे भोसले यांनी १० शिलाई मशिन भेट दिल्या होत्या.

तसेच शिलाई प्रशिक्षणही मोङ्गत दिले होते. प्रशिक्षण पुर्ण करुन या गटातील महिला आता कापडी पिशव्या तयार करत असून त्यांना हक्काचा उद्योग मिळाला आणि खर्‍या अर्थाने त्या स्वावलंबी झाल्या आहेत.
 
     काही दिवसांपुर्वीच सौ. वेदांतिकाराजे यांनी कामाठीपुरा येथील बचत गटातला १० शिलाई मशिन भेट दिल्या होत्या. यानंतर गटाच्या अध्यक्षा कमल माळी, रेखा कुडाळकर, उषा कुडाळकर, उमा कुडाळकर, कोयना जावलीकर, रोशन मोरे, स्वाती मोरे, सुरेखा मोरकर, रोहिणी जावलीकर, रोशन माळी यांच्यासह गटातील महिलांनी मोङ्गत शिलाई प्रशिक्षण घेतले. आता या महिला स्वत: कपडे शिवण्याचे काम करत असून त्यांना रोजगार उपलब्ध झाला आहे. या यशस्वीतेबद्दल गटाच्या अध्यक्षा माळी आणि सदस्य महिलांनी सौ. वेदांतिकाराजे भोसले यांचे आभार मानले असून तुमच्या सहकार्यामुळे आम्ही स्वावलंबी झालो, असे म्हणत या महिलांनी आनंद व्यक्त केला.

दरम्यान, या महिलांना प्रमाणपत्र मिळाले असून त्यांना व्यवसायासाठी बचत गट अथवा शासनाच्या मुद्रा योजनेमार्ङ्गत अर्थसहाय्य होते. त्यामुळे कामाठीपुरातील महिलांप्रमाणेच इतरही बचत गटातील महिलांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा. आज महागाईमुळे जनजीवनावर मोठा परिणाम झाला आहे. रोजंदारी, मजुरी करणार्‍या गोर- गरीब घरातील मुलांना शिक्षणापासून वंचीत रहावे लागते. घरातील कमवत्या पुरूषाला कुटूंबाचा गाडा हाकताना अनंत अडचणी येतात. अशा कुटूंबाना आर्थिक सबल करण्यासाठीच महिला बचत गट महत्वाचे आहेत.

सावित्रीबाई ङ्गुले महिला बचत गटातील महिला जिद्दी आणि कष्टाळू आहेत. या गटातील महिला आता शिलाई व्यवसायातून स्वत:च्या पायावर उभे राहिल्या आहेत. शिलाई व्यवसायातून या बचत गटातील महिलांची आर्थिक उन्नती आणि सबलीकरण होणार असून कुटूंबाला आर्थिक हातभार लागणार आहे. या बचत गटाचा आदर्श इतरही गटांनी घ्यावा आणि आपली उन्नती साधावी, असे आवाहन सौ. वेदांतिकाराजे भोसले यांनी केले आहे. 

Adv