सातारा जिल्हा पोलीस दलाचा दणका,भुपाल घाडगे सह 6जण एक वर्षासाठी तडीपार

43
Adv

वाई पोलिस ठाणे हद्दीत घरफोडी चोरी करणाऱ्या टोळीचा प्रमुख आकाश शिवाजी वागले राहणार वाई ,करण घाडगे, भुपाल किसन घाडगे , राहुल घाडगे, कैलास काळे सर्व राहणार सैदापूर,यांना माननीय पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी वाई ,महाबळेश्वर खंडाळा हद्दीतून एक वर्ष कालावधी करता हद्द परीचा आदेश केला आहे

तसेच वडूज पोलिस ठाणे हद्दीत बेकायदा एकूण पाच पिस्टल व दहा जिवंत काडतुसे बाळगणे खंडणी मागणे ,गर्दी ,मारामारी करून पळून नेणे ,असे गुन्हे करणाऱ्या टोळीचा प्रमुख सौरभ जाधव ,सौरभ कुलकर्णी राहणार गुरसाळे तालुका खटाव जिल्हा सातारा यांनाही पोलीस अधीक्षक यांनी सातारा, कोरेगाव ,खटाव मान फलटण, खंडाळा, तालुका हद्दीतून एक वर्ष कालावधीसाठी हद्दपारीचे आदेश केला असल्याचे पोलिसांच्या वतीने सांगण्यात आले

जिल्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेचे सर्जेराव पाटील यांनी चार्ज घेताच सात जणांवर तडीपारीची कारवाई केल्याने जिल्ह्यातून समाधान व्यक्त होत आहे सर्जेराव पाटील यांच्याकडून अशाच करावया पुढे चालू रहाव्यात अशी अपेक्षा सातारकर नागरिकांकडून व्यक्त होत आहे

या कारवाईचे सर्व स्तरातून समाधान व्यक्त होत आहे जिल्ह्यात अशाच प्रकारे समाजामध्ये दहशत पसरवणाऱ्या समाजात बेकायदेशीर कारवाई करणाऱ्या टोळ्यांचे विरुद्ध तडीपारीची कारवाई सुरूच राहणार असल्याचे पोलीस यांच्या वतीने सांगण्यात आले असून जिल्हा पोलिस दलाचे जिल्ह्यातून या निर्णयाचे स्वागत होत आहे

Adv