गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान संपर्क कार्यालयाची पंकजाताई मुंडे यांनी केली पाहणी

51
Adv

गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या अध्यक्षा पंकजाताई मुंडे यांनी आज वरळी (मुंबई) येथील संपर्क कार्यालयाची पाहणी केली.

लोकनेते मुंडे साहेबांचे हे कार्यालय २६ जानेवारी पासून पुन्हा सुरू करण्याची घोषणा त्यांनी १२ डिसेंबर ला गोपीनाथ गडावर केली होती. वरळीच्या या कार्यालयाचे नुतनीकरणाचे काम आजपासून हाती घेण्यात आले आहे. पंकजाताई मुंडे यांनी कार्यालयाची संपूर्ण पाहणी करून आवश्यक त्या सूचना आर्किटेक्टला केल्या.
जन सामान्यांच्या सेवेत सातत्याने असणारे लोकनेत्याचे हे कार्यालय नवीन वर्षापासून पुन्हा एकदा गजबजून जाणार आहे.

Adv