गेल्या तीन वर्षांपूर्वी श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याकडे बघून सातारकरांनी सातारा विकास आघाडीला पालिकेची सत्ता दिली त्याच बरोबरच सर्वसामान्य नगराध्यक्ष ही दिला मात्र त्याच नगराध्यक्ष विरोधी नगरसेवकांना फंड देण्यात एकदम पुढे असल्याचे दिसते
(सातारतील काही नगरसेवकांशी संपर्क साधला असता आम्हाला तुम्ही फंडा चे विचारता साधा चहा दहा रुपयाचा पाजू शकल्या नाहीत ही शोकांतिका असल्याचे सांगितले)
सातारा विकास आघाडीच्या विद्यमान नगरसेविका नगरसेवकांची ही अशी अवस्था असेल तर येणाऱ्या दोन वर्षानंतर पालिकेच्या निवडणुकांमध्ये कोणत्या तोंडाने आम्ही नागरिकांकडे मते मागायची काय उत्तरे द्यायची रोज आमच्या घरी येऊन नको नको ते नागरिक बोलतात आम्ही काय फक्त गटारी आणि लाईट चिच कामे करायची का सहा सहा महिने झाले आम्ही पत्र देऊन संबंधित पत्रावर काहीच कारवाई नगराध्यक्ष यांच्याकडून कडून होत नाही अशी नाराजी ही नगरसेवकांनी बोलून दाखवली
काही नगरसेवक तर म्हणाले अशा नगराध्यक्ष जर वागत असतील तर सत्ता कशी येईल ज्या नगरसेविका नगरसेवक त्यांचा ऐकेल त्यांनाच फंड दिला असल्याचे खाजगीत काही नगरसेवकांनी सांगितले या सर्व गोष्टींचा लाभ घेऊन मुख्याधिकारी मात्र आपली पोळी भाजून घेण्यात अग्रेसर असून त्यांचा वचक अधिकाऱ्यांवर नाही मुख्याधिकारी यांच्यावर नगराध्यक्षांचा वचक नसल्यामुळे पालिके पेक्षा ग्रामपंचायत बरी अशीच म्हणण्याची वेळ आली असल्याचे दिसते
एखाद्या नगरसेविकेला गाडीने सोडायचे म्हंटले तर या कुणाला गाडीने सोडू नका असे फर्मान सोडतात त्यांचा शिपाई तर त्यांच्यापेक्षा वरचढ आहे़़़़ राहुल हा शिपाई कशामुळे बदली झाला याची चर्चा जोरदार पालिकेमध्ये रंगली लक्ष्मी दर्शनात कोणी घोळ केला त्यात राहुलचा बळी का दिला अशी चर्चा बी पालिकेत असल्याचे समजते म्हणून सांगतो रस्त्यावर या सर्वसामान्य नगराध्यक्ष म्हणून फिरा व आपल्या आघाडीची उंची वाढवा ़़़़़़़ क्रमशः