राजवाडा बस स्टॉप ते विठोबा मंदिर परिसरात रस्त्यावर बेकायदेशीररित्या ॲपे रिक्षा व हात गाडी वरती भाजी विक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणी मंडईतील व्यापाऱ्यांनी आज मुख्याधिकारी शंकर गोरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे त्यांच्यावर कारवाई न झाल्यास आम्हीही रस्त्यावर भाजी विक्री करू असा इशाराही त्यांनी यावेळी दिला
पालिकेने नेमून दिलेल्या कट्ट्यांवर आम्ही भाजी विक्री करत असून रस्त्यावरच्या भाजी विक्री मुळे आमच्या धंद्यावर परिणाम होत असून सदरचे भाजीविक्रेते रस्त्यावरचे हे अनधिकृत असून सायंकाळी सहा ते नऊ या वेळेत अनधिकृतपणे भाजीविक्रेते भाजी विकताना दिसतात यांच्यावर पालिकेने कठोर कारवाई करावी तसेच ज्यांना कट्टा दिला असून त्यांची काही माणसे ही या रस्त्यावर भाजी विकत असून त्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणीही व्यापाऱ्यांनी केली आहे
पालिकेच्या अतिक्रमण विभागानेही यांच्यावर कारवाई करावी मोती चौक ते विठोबाचा मंदिर अशी सायंकाळी सहा ते नऊ या वेळेत रस्त्यावर ही अनाधिकृत भाजीविक्री चालते मुख्याधिकारी यांच्याशी चर्चा झाल्यानंतर सायंकाळी सहा ते नऊ एक माणूस नेमण्याचे आश्वासन व्यापाऱ्यांना मुख्य करणे दिले असल्याचे व्यापाऱ्यांनी बोलताना सांगितले