महिलांच्या सुरक्षेला माझे प्राधान्य प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर

68
Adv

सध्या महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट असून मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष चालू करण्यास परवानगी दिली असून या कक्षाचा कारभार खाजगी व्यक्ती कडे न देता शासकीय अधिकाऱ्याकडे देऊन होणाऱ्या भ्रष्टाचाराला आळा बसावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी सातार्यात आयोजित पत्रकार परिषदेत केली

पाच वर्षात स्वतंत्र गृहमंत्री नसल्याने महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर आहे हे अहवालात स्पष्ट झाले असून माझे प्राधान्य हे महिला सुरक्षिततेला असेल असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले

जिल्ह्यातील महिलांची आढावा बैठक घेऊन महिलांना मार्गदर्शन केले महिला आढावा बैठक महिला सुरक्षितता अशा विविध कारणांमुळे सातारा जिल्हा दौऱ्याचे आयोजन केले होते मला मंत्री पदाची अशा नसून तसे असते तर मी आज मुंबईत दिसले असते मी पक्षाची स्टार प्रचारक होते पक्षाकडे आजपर्यंत काही मागितले नसून प्रामाणिक कार्यकर्त्याला न्याय देणारा पक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले

Adv