म्हसवड येथील सिद्धनाथ यात्रेचा 27 नोव्हेंबर हा मुख्य दिवस असल्याने कायदा व सुव्यवस्था
अबाधित ठेवण्यासाठी मुंबई मद्य निषेध कायदा 1949 मधील कलम 142(1) मधील तरतुदीनुसार जिल्हाधिकारी श्वेता सिंघल सातारा यांनी म्हसवड शहरातील सर्व देशी दारु विक्री, बिअर विक्रीपरवाने, (एफएलबिआर-2), विदेशी मद्य विक्री (एफएल-2), परवानाकक्ष (एफएल-3),बिअर बार (फॉर्म इ) व ताडी दुकान टिडी-1 या अनुज्ञप्तीच्या जागा व विक्री परवाने दि.27 नोंव्हेंबर रोजी बंद ठेवण्याचे आदेश दिले आहे.
या आदेशाची अंमलबजावणी काटेकोरपणे करावयाची असून त्यात कसूर झाल्यास संबंधित अनुज्ञप्तीधारकांच्या विरुध्द कडक कारवाई करण्यात येईल यांची नोंद घ्यावी.