Saturday, April 25, 2026
spot_img
Home Satara District Satara City अखेर सातारानामा चे वृत्त ठरले खरे पालिकेत भाजपला मिळणार सभापतिपद

अखेर सातारानामा चे वृत्त ठरले खरे पालिकेत भाजपला मिळणार सभापतिपद

107
Adv

काही दिवसांपूर्वी सातारानामाने पालिकेत भाजपच्या नगरसेवकांना हवय सभापतिपद हे वृत्त प्रसारित केले होते ते आता खर ठरत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे सातारा पालिकेतील सभापती निवडीची गुरुवारी पुणे येथे बैठक घेतली . या बैठकीत पाणीपुरवठा, बांधकाम व आरोग्य सभापती बदलावर चर्चा झाल्याने खांदेपालट निश्चित झाल्याचे वृत्त आहे .

सातारा पालिकेची सभापती निवडीची शनिवारी विशेष सभा आहे . या सभेच्या पाश्र्वभूमीवर उदयनराजे यांनी चर्चेसाठी पालिकेचे एक पदाधिकारी तसेच माजी उपनगराध्यक्ष व पक्षप्रतोद त्यांच्याबरोबर माजी सभापती व नगरसेवक यांना पुणे येथे बोलावले होते .

. सभापती निवडीच्या निमित्ताने इच्छुकांच्या नावाची चर्चा झाली मात्र ती जाणीवपूर्वक गुलदस्त्यात ठेवण्यात आली . मात्र ज्या समित्यांची कामे व बैठका सुरळीत होत नाहीत यांचाही आढावा यावेळी घेण्यात आला . वेगवेगळ्या विषयांच्या निमित्ताने उदयनराजे यांनी सकाळी साडेअकरा वाजल्या पासून तब्बल साडेपाच तास मॅरेथॉन बैठक घेतल्याची माहिती आहे .

. पाणी पुरवठा सह बांधकाम व आरोग्य या खात्यांचे कारभारी बदलण्याचे संकेत आहेत . संभाव्य नूतन सभापती पदांसाठी सातारा विकास आघाडीकडून दोन नगरसेवक व एका सभापतीपदावर भाजपच्या नगरसेवकाला संधी मिळण्याची शक्यता आहे . सत्ताधारी सातारा विकास आघाडीचा पालिकेत ते वीस महिन्याचा कार्यकाल शिल्लक आहे .

नियोजन सभापती , व उपनगराध्यक्ष पद वगळता इं पदांचे बदल होणार असल्याने पुन्हा संधी कोणाला ? ही औत्सुक्याचा विषय आहे . स्थायी समिती रचना व निमंत्रित व विषय समिती सदस्य यांची नावे शनिवारी सभेपूर्वी श्रीमंत छत्रपती उदयनराजे यांच्याकडून कळवली जाणार आहेत .

Adv