उपशिक्षक भिसे सर यांना रोटरी क्लब सातारा यांचेकडून शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल गौरवण्यात आले.

98
Adv

पिंपोडे बुद्रुक : ( प्रतिनिधी )
रयत शिक्षण संस्थेचे पिंपोडे बुद्रुक येथील यशवंतराव चव्हाण विद्यालयातील उपशिक्षक श्री. शिवाजी दत्तात्रय भिसे यांना रोटरी क्लब सातारा यांच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल *नेशन बिल्डर अवार्ड 2019* देऊन गौरवण्यात आले. श्री शिवाजी दत्तात्रय भिसे हे एम.ए.डी.एड असून गेली 17 वर्षे उत्कृष्ट अध्यापनाचे काम करतात. पिंपोडे बुद्रुक येथील विद्यालयात ते गेली आठ वर्ष कार्यरत आहेत. या विद्यालयात ते गुरुकुल प्रमुख व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक म्हणून काम करत आहेत, विद्यार्थी व मुख्याध्यापक यांच्या मूल्यमापनातून रोटरी क्लब सातारा यांचेकडून *राष्ट्रनिर्माण पुरस्कारासाठी* त्यांची निवड करण्यात आली.

26 नोव्हेंबर 2019 रोजी कर्मवीर भाऊराव पाटील अभियांत्रिकी विद्यालय सातारा या ठिकाणी त्यांना करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्राचार्य डॉ. एस सी आतार, मा.श्री. तुषार भद्रे ज्येष्ठ पत्रकार सातारा यांच्या हस्ते शाल श्रीफळ प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. या कार्यक्रमासाठी रो.श्रीकांत निकम रो.शंकरराव करपे रो.शशिकांत रसाळ डॉ. आनंद ओक उपस्थित होते.
रयत शिक्षण संस्थेच्या मध्य विभागाचे इन्स्पेक्टर मा. कमलाकर महामुनी यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले. विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.भोसले सर,पर्यवेक्षक श्री. चव्हाण सर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सर्व विद्यार्थी पालक यांनी त्यांचे अभिनंदन केले.

फोटो खालील ओळ : शैक्षणिक क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल श्री.भिसे सर यांचे विद्यालयाच्या वतीने पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन अभिनंदन करण्यात आले.

Adv