Saturday, April 25, 2026
spot_img
Home Satara District Koregaon आ महेश शिंदे यांच्या स्वखर्चाने कोरेगाव येथे 300 बेडचं कोरोना सेंटर

आ महेश शिंदे यांच्या स्वखर्चाने कोरेगाव येथे 300 बेडचं कोरोना सेंटर

182
Adv

सातारा जिल्ह्यातील कोरेगाव विधानसभेचे आमदार महेश शिंदे यांनी स्वखर्चाने कोरेगाव येथिल जितराज मंगल कार्यालयात कोरोना बधितांसाठी 300 बेडचं अद्यावत व ऑक्सिजन सुविधा युक्त कोरोना सेंटर सुरू केले असून मतदार संघातील एकही कोरोना बाधित व्यक्ती उपचारापासून वंचित ठेवणार नाही असंही शिंदे यांनी सांगितले.

सोमवारी सकाळी ९ वाजता आ.महेश शिंदे यांनी येथील जितराज मंगल कार्यालय येते कोरोना सेंटरची पाहणी केली,तसेच या सेंटर मद्ये कोरेगाव मतदार संघातील ज्या व्यक्तीना कोरोना झाल्यास त्वरीत उपचार मिळणार आहे.शिंदे यांनी “आपल्या मतदार संघातील एक ही कोरोना पेशंट उपचारापासून वंचित राहणार नसल्याचे या वेळी सांगितले.

पहिल्या टप्प्यामध्ये 100 कोरोणा पेशंटवर उपचार केले जाणार असून दुसऱ्या टप्प्यात 150 परत 100 पेशंटवर उपचार केले जाणार आहेत संपूर्ण डॉक्टर स्टाफ सहित हे कोरोना सेंटर आमदार महेश शिंदे उभारणार असून याचा संपूर्ण खर्च हे स्वतः करणार आहेत सर्व सुविधांसह हे कोरोणा सेंटर उभारले जात असल्याने जिल्ह्यातील एकमेव हे सर्व सोयींयुक्त सेंटर असल्याचे मानले जाते

या कोविड सेंटर मध्ये कोरोना पेशंटला ऑक्सिजनची अद्यावत सुविधा असेल.खऱ्या अर्थाने या मतदार संघातील लोकांसाठी केलेलं हे कार्य निश्चितच कौतुकास्पद असल्याने जनतेमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

Adv