८३ गावांना होणार जलजीवन मिशन योजनेचा लाभ छ उदयनराजे

563
Adv

सातारा जिल्ह्यातील जावली,कराड,पाटण,फलटण,सातारा,
खटाव,खंडाळा आणि कोरेगांव तालुक्यातील एकूण 83 गावातील शुध्द व मुबलक पिण्याच्या पाण्याच्या सूविधेसाठी केंद्र व राज्य शासनाच्या जलजीवन मिशन योजनेअंतर्गंत सुमारे 26 कोटी रुपयांच्या पाणी योजना प्रस्तावित करण्यात आल्या असून, योजनांचा सन 2022-23 व 2023-24 सालच्या आराखडयात समावेश करण्यात आलेला आहे. प्रत्येक गावांत, स्वच्छ-शुध्द व मुबलक पाणीपुरवठा होण्याच्या दृष्टीने आमचे प्रयत्न आहेत.येत्या काही महिन्यात जलजीवन मिशन अंतर्गंत 83 गांवातील नळपाणीपुरवठा योजना कार्यान्वित होतील अशी अपेक्षा आहे अशी माहीती खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिली आहे.

केंद्रशासनाच्या माध्यमातुन जिल्हा परिषदेच्या मार्फत केंद्र व राज्य शासनाचा समान हिस्सा योजना राबविली जाते. हर घर नलसे जल हे ब्रीद घेवून, प्रतिमाणशी प्रतिदिन 55 लिटर शुध्द व स्वच्छ पाणीपुरवठा होण्यासाठी सातारा जिल्हयातील खाली नमुद केलेप्रमाणे तालुकानिहाय गावांना, जलजीवन मिशन योजना राबविणेबाबत आम्ही प्रस्तावित केले होते. या सर्व गावांचा जलजीवन मिशनच्या सन 2022-23 आणि सन 2023-24 या वार्षिक आराखडयात समावेश करण्यात आलेला आहे. या योजनांचा एकूण अंदाजित खर्च रुपये 26 कोटी अपेक्षीत आहे. तालुकानिहाय गावे पुढील प्रमाणे-

जावली -आंबेघर त.मेढा, अंधारी, धसनगरवाडी, गढवली, करहर, खर्शी त.कुडाळ, कुरलोशी, महामुलकरवाडी,
मोरावळे, वाघदरे,
कराड- चचेगांव, चोरे, धावरवाडी, गोळेश्वर, इंदोली, काळगांव,कार्वे,कोडोली,मालखेड,साबळेवाडी, सावरघर,
येळगोव,
खंडाळा- भादवडे, घरगरवाडी, कान्हेरी, कोपडे, वडगांव,
खटाव- अनपटवाडी, काटेवाडी, खाबलवाडी,
कोरेगांव- नलवडेवाडी, रिकिबदारवाडी, सोनके, तडवळे सं.वाघोली, तादूळवाडी, त्रिपुटी, वेळू, भीमनगर,
बोरिव,दुधनवाडी,दुर्गळवाडी,एकसळ, कण्हेरखेड,करंजखोप, किरोली, अरबवाडी, आर्वी,भक्तवडी,
पाटण- कुंभारगांव, माजगांव,नाडोली, आंब्रक, गोजेगांव, हेळवाक,
फलटण- खुंटे, कुरवली बुा, उपळवे, वडगांव,
सातारा- अपशिंगे,धोंडेवाडी, डोळेगांव, फडतरवाडी,फत्यापूर, ज्योतिबाची वाडी, कामेरी,खोजेवाडी,कोपर्डे,
क्षेत्रमाहुली, मत्यापूर, मापरवाडी, नांदगांव, पिंपळवाडी, तासगांव, वडूथ, किसनवीरनगर,उडतरे,
महाबळेश्वर- अवळण, भेकवली, दांडेघर, खंबीलचोरगे, पारुट, उचाट

पिण्याच्या पाण्याची अनन्यसाधारण गरज लक्षात घेवून, मुबलक पाणीपुरवठा होण्यासाठी सुमारे 26 कोटींच्या योजनांचा जलजीवन आराखडयात समावेश झाल्याने, या योजना लवकरच अस्तित्वात येतील असेही खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी नमुद केले आहे.

Adv