*पक्ष बदलला आहे राजघराणे आणि विचार नाही त्यामुळे* *विरोधकांच्या भूलथापांना बळी पडू नका – शिवेंद्रराजेयांनी* *मुस्लिम समाजाला दिला विश्वास*
राजघराणे हे पहिल्यापासून मुस्लिम समाजाला कुटुंबातील सदस्याची वागणूक आणि प्रेम देत आहे कोणताही पक्ष ह्यात बदल करू शकत नाही त्यामुळे विरोधकांच्या भूलथापांना बळी न पडता आम्ही पक्ष बदलला आहे विचार आणि घराणे नाही अशा शब्दात शिवेंद्रराजे यांनी सातार्यातील मुस्लिम बांधवांना विश्वास देण्याचा प्रयत्न केला .
महाराज प्रत्येक निवडणुकीत मुस्लिम समाजाने राजघरण्यवार प्रेम दाखवून साथ दिली आहे कोणी समाजकंटक तुम्हची दिशाभूल करत असेल परंतु साताऱ्यातील मुस्लिम समाज राजघराण्यावर प्रेम करत आहे हे पुन्हा एकदा 24 ऑक्टोबर ला सिद्ध होणार असा विश्वास मुस्लिम बांधवांनी राजघराण्याच्या दोन्ही उमेदवाराला दिला
लोकसभा पोटनिवडणुकी आणि विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी शिवेंद्रराजे यांनी मुस्लिम समाजातील प्रतिष्ठित नागरिक आणि समाजबांधवांच्या भेटी गाठी घेतल्या त्याचबरोबर त्यांच्याशी पक्षातरानंतर होत असणाऱ्या अपप्रचाराबद्दल चर्चा ही केली व दोन्ही राजेंना निवडून अणण्यासंदर्भात आवाहन ही केले .
मुस्लिम समाजबांधवांच्या बैठकीत समाजाच्या मान्यवरांनी राजघरण्याबद्दल मुस्लिम समाजाचे प्रेम व्यक्त करत दोन्ही राजेंना निवडून आणणार असल्याचा निर्धार केला
ह्यावेळेस अल्लाउद्दीन शेख , नासिरशेठ बागवान ,इंटेखाब बागवान, शकील बागवान , सादिकभाई शेख ,फिरोज पठाण ,नासिरशेठ बागवान ,रफिक फरास ,मुक्तार पालकर , सलीम कच्ची ,हनिफ कच्छी,अन्सार आतार मान्यवर उपस्थित होते