धनगर वाडी तालुका खंडाळा गावच्या हद्दीतील मोठे वस्तीजवळ दोन गटात तुंबळ हाणामारी भाजप युवा मोर्चा माजी अध्यक्ष शिवतरे यांना तलवारीने सपासप वार करून खून करण्यात आला आहे व दोघे जखमी गंभीर आहेत.खंडाळा पंचायत समितीचे सभापती मकरंद उर्फ मारुती मोटे हे कुटुंबासह हायवेरोड नजीक मोटे वस्ती जवळ राहत आहेत.मकरंद मोटे यांचा मुलगा अनिकेत मोटे व मयूर शिवतरे यांच्यामध्ये दूरध्वनीवरून शाब्दिक चकमक झाली होती.
रात्री दहा वाजता सुमारास मयूर शिवतारे हा काही लोकांसमवेत मोटे वस्ती जवळ आला व त्यावेळी दोन्ही गटात तुंबळ हाणामारी झाली.यामध्ये तलवारीे व घातक शास्त्राचा वापर झाला. मयूर शिवतारे यांच्या वर सहा-सात वार झाले. तो गंभीर जखमी झाला. यावेळी गंभीर जखमी झालेल्या मयूर शिवतारे याला शिरवळ येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
रवी मोटे व योगेश मोटे हे गंभीर जखमी झाले आहेत.
शिरवळ खंडाळा लोणंद पोलिसांनी धाव घेतली व अधिक तपास शिरवळ पोलिस करीत आहेत. जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते,पोलीस उपाधिक्षक तानाजी बर्डे, व धीरज पाटील यांनी घटना स्थळी भेट दिली आहे.अधिक तपास पो.नि.उमेश हजारे करीत आहेत.