Monday, April 27, 2026
spot_img
Home Satara District श्री छ उदयनराजेंना खासदारकीचं प्रमाणपत्र मिळालं, आता एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात मंत्रीपद?

श्री छ उदयनराजेंना खासदारकीचं प्रमाणपत्र मिळालं, आता एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात मंत्रीपद?

115
Adv

राज्यसभेवर बिनविरोध निवड झाल्याचे अधिकृत प्रमाणपत्र निवडणूक विभागाने उदयनराजे भोसले यांच्याकडे सोपवले आहे. त्यामुळे भाजपाकडून त्यांना कोणते मंत्रीपद दिले जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेलं आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात उदयनराजे पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार असून त्यावेळी मंत्रीपदाचा निर्णय होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान, एप्रिल महिन्यात श्रीमंत छत्रपती उदयनराजे राज्यसभेच्या सदस्यत्वाची शपथही घेण्यासाठी दिल्लीला जाणार आहेत. त्यावेळी ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतील. या भेटीत उदयनराजेंच्या मंत्रीपदाबाबतचा निर्णय अंतिम होईल. त्यामुळे सातारकरांना एप्रिलपर्यंत खासदार उदयनराजेंच्या मंत्रीपदाची वाट पहावी लागणार आहे.

लोकसभा पोटनिवडणुकीतील पराभवानंतर श्रीमंत छत्रपती उदयनराजे यांना भाजपाच्या नेत्यांकडून राज्यसभेवर घेण्याचे आश्‍वासन देण्यात आले होते. त्यानुसार महाराष्ट्रातील रिक्त झालेल्या सात जागांपैकी एका जागेवर उदयनराजे बिनविरोध निवडुन आले. अर्ज मागे घेण्याच्या दिवशी निवडणूक आयोगाने बिनविरोध निवडून आल्याबद्दलचे प्रमाणपत्र त्यांना दिले. हे प्रमाणपत्र मुंबईत उदयनराजेंचे समर्थक नगरसेवक ऍड. दत्तात्रेय बनकर व जितेंद्र खानविलकर यांनी स्वीकारले.

Adv