कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर वित्तीय संस्थांचा कर्ज वसुलीचा अमानवी उपचार 

50
Adv

देशातील नव्हे तर जग सध्या आर्थिक संकटात सापडले आहे. असे असताना छत्रपती शिवरायांची राजधानी असलेल्या साताऱ्यात कर्ज वसुलीचा तगादा लावला जात आहे.याबाबत आता आम आदमी पार्टीने रस्त्यावर उतरण्याची तयारी सुरू केली आहे.अशी माहिती आम आदमी पार्टीची पश्चिम महाराष्ट्र खजिनदार सरदार तथा सागर भोगावकर,शिवाजी काळभोर यांनी दिली आहे.                      सातारा जिल्हा हा क्रांतिकारक यांचा जिल्हा आहे. अनेक शेतीपूरक व्यवसाय या जिल्हयात होत आहे. सध्या शेती व जोड व्यवसायाला मजुरांची गरज आहे.पण,कोरोना व्हायरसमुळे मजूर मिळत नाही.शेती उत्पादन रानात पडून आहे अशा वेळी वित्तीय संस्थेचे पगारी नोकर कर्जदारांच्या घरी जाऊन दमदाटी करून कर्ज भरण्याची ताकीद देत आहेत. महिला वर्गाला अपमानस्पद वागणूक देत आहेत.विशेष म्हणजे हे पगारी नोकर शेतकरी कुटूंबातील सातारा जिल्ह्यातील आहेत.                                                   अशा प्रकरणात हप्ता भरा म्हणून आगाऊपणा केला अशा कर्जवसुली करणाऱ्या गुन्हेगारांवर गुन्हा  दाखल झाल्यास शेतकरी कुटूंबातील लोक धावून येतात.याचा अनुभव संघटनेने घेतला  त्यामुळे कोरोना साथ पूर्णनष्ट होत नाही तो पर्यंत कर्ज वसुली थांबवा अशी मागणी आम आदमी पार्टीची पश्चिम महाराष्ट्र खजिनदार सरदार तथा सागर भोगावकर व कर्जबाजारी व्यवसायिक पवन पुजारी,विकास जाधव यांनी केली आहे

Adv