महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर हे काही दिवसांपूर्वी सातारा दौऱ्यावर होते राजेश क्षीरसागर आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील जिल्हाप्रमुखांच्या कार्यपद्धतीवर काही शिवसैनिकांनी आपली नाराजी राजेश क्षीरसागर यांच्या समोर जाहीर रित्या व्यक्त केली?असल्याचे समोर आले आहे
सातारा जिल्ह्याचे सुपुत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे दोन जिल्हाप्रमुख असून यांच्या कार्यपद्धतीवर शहरातील काही शिवसैनिकानी आक्षेप घेतला असून कोणत्याही प्रकारचे सहकार्य होत नसल्याने आपली नाराजी राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या समोरच दाखवल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जिल्ह्यातच जर अशा पद्धतीने शिवसैनिकांमध्ये नाराजी वाढत असेल तर जिल्ह्यामध्ये पक्ष वाढणार तरी कसा हा खरा प्रश्न उपस्थित झाला आहे
संपूर्ण महाराष्ट्रात एकनाथ शिंदे हे आपला पक्ष वाढवत असून त्यांच्या जिल्ह्यातच त्यांच्याच पक्षातील शिवसैनिकांवर अन्याय होणारे असे जर प्रकार घडत असतील तर एक प्रकारे येणाऱ्या काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला धोक्याची घंटाच म्हणावी लागेल याप्रकरणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लक्ष घातले नाही तर जिल्ह्यातच पक्षाला एक प्रकारे आव्हान निर्माण झाले असल्याचे दिसून येते