राजवाडा mseb ऑफिसचा सावळा गोंधळ सध्या वारंवार दिसून येत असून आठवड्यातून लाईट जाण्याचे प्रमाण वाढले असल्याने नागरिकांनी फोन केला तर उलट उत्तरे देण्याचे प्रमाण कर्मचाऱ्ंयाकडून वाढत असल्याने महाराष्ट्र राज्य विद्युत महा मंडळाचे उच्च अधिकारी अमित बारटक्के राजवाडा ऑफिसला शिस्तीचा 440 चा करंट देणार का असा प्रश्न नागरीक विचारू लागले आहेत सध्याचे युग ऑनलाइन चे युग असून काही वर्ग हा घरातून onlin नोकरी करत काम करतो असतो सध्या परीक्षेचे सुद्धा दिवस असून आठ आठ नऊ नऊ तास व वारंवार जर लाईट जात असेल तर या राजवाडा ऑफिसचा उपयोग तरी काय असा प्रश्न उपस्थित होत आहे
राजवाडा चौपाटी जवळ महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाचे ऑफिस असून या ऑफिसमध्ये कर्मचारी संबंधित नागरिकांनी लाईट कधी येणार विचारपूस केली असता उलट उत्तर देण्यात गुंग असतात मात्र वाद नको म्हणून तक्रार टाळण्याचे काम नागरिक करताना दिसून येतात अलीकडच्या काही महिन्यांमध्ये राजवाडा mseb ऑफिसचा भोंगळ कारभार वारंवार समोर येत असून शुक्रवार पेठ, राधिका चौक ,गेंडावळ नाका ,गडकराळी आधी काही भागांमध्ये या राजवाडा ऑफिसचा भोंगळ कार भाराचा फटका बसत असून महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाचे उच्च अधिकारी अमित बारटक्के साहेब यांनीच आता या राजवाडा mseb ऑफिसला शिस्तीचा 440चा करंट द्यावा अशी अपेक्षा येथील सामान्य नागरिक करत आहेत
राजवाडा ऑफिसचे श्री पाटील साहेब यांना लाईट कधी येणार विचारले असता माहिती घेऊन सांगतो अशी त्यांची उत्तरे असतात या राजवाडा ऑफिसचे इन्चार्ज श्री पाटील साहेब यांच्याकडे असून यांना जर आपल्या ऑफिसचे काम कुठे चालले आहे माहिती नसेल तर नक्की फ्युज राजवाडा ऑफिसचा गेला की कुणाचा गेला असेच म्हणावे लागेल