मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महाबळेश्वर पाचगणी कोयना परिसराच्या पर्यटनाची तळमळीने आस आहे . मात्र या परिसराचा भाग असलेल्या व जैवविविधतेचा वारसा जपणाऱ्या कास पठारावर सुरू झालेली बारबालांची छम छम या पर्यटन विकासाला विकृतीचे ग्रहण लावणारी आहे धर्मवीर या चित्रपटात बारबालांचे अतिक्रमण रोखण्यासाठी दिवंगत नेते आनंदी दिघे यांनी एकनाथ शिंदे यांचीच निवड केली होती हा चित्रपटाचा जरी भाग झाला तरी प्रत्यक्षात आपल्या जिल्ह्यातील बारबालांचे विकृती रोखण्यासाठी मुख्यमंत्र्यांनीच आपल्या भागाच्या विकासासाठी राजकीय इच्छाशक्ती दाखवणे गरजेचे आहे
कोयनेच्या खोऱ्यातील गावे आणि त्यांचा पर्यटन विकास ही काळाची गरज आहे मात्र आजपर्यंत त्या दृष्टीने राजकीय इच्छाशक्तीची पावले पडले नाहीत .तरी या गावाचा सुपुत्र म्हणजेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर कास कोयना महाबळेश्वर परिसरातील ग्रामीण भागातील गावांचा चेहरामोहरा बदलू लागला मात्र याच कोयनेच्या कुशीत असलेल्या कास पठार आणि तलाव परिसरातील भागांमध्ये आलिशान रिसॉर्ट आणि तेथील अनधिकृत बांधकामे यांनी उचल खाल्ली . ही वाढती बांधकामे नियमित करण्याच्या दृष्टीने ठोस आराखडा मुख्यमंत्र्यांनी देऊन जिल्हा प्रशासनाकडून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी सूचक मार्गदर्शन करणे गरजेचे आहे महाबळेश्वर मधील अनधिकृत अतिक्रमणांवर कारवाईचा हातोडा चालवण्यात आला तेव्हा सुद्धा हॉटेल मालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांकडे धाव घेतली होती मात्र शाश्वत विकास होताना लँडमाफीया यांना त्यात सवलत मिळू नये एवढीच अपेक्षा आहे .
कास पठारावरील एका प्रतिष्ठित हॉटेलमध्ये बारबालांचा नाच झाला या घटनेने संपूर्ण कास पर्यटन आणि हॉटेल व्यवसायिकांचे विश्व ढवळून निघाले आहे या पठारावर बारबाला कशा आल्या त्या कोणी बोलवल्या होत्या या संदर्भात सातारा तालुका पोलीस कसून चौकशी करत आहेत . नागठाणे येथील हॉटेल मालक याचे वाढते राजकीय प्रस्थ आणि त्या प्रभावातून ही पार्टी झाली काय याविषयी पोलिसांनी तपासाचा हात आखडताच घेतला आहे मात्र ऐतिहासिक वारसा स्थळ असणाऱ्या या कास पठारावर बारबालांची छम छम भविष्यातील धोकादायक पर्यटकांची नांदी ठरू नये .
अभिनेते प्रसाद ओक अभिनीत धर्मवीर या चित्रपटात प्रसाद ओक यांनी स्वर्गीय नेते आनंद दिघे यांची भूमिका वठविली होती त्या चित्रपटाच्या एका दृश्यामध्ये ठाणे जिल्ह्यात असाच बारबालांचा उच्छाद सुरू असताना ते आव्हान रोखण्यासाठी दिघे साहेबांनी एकनाथ कुठे आहे ? असा प्रश्न विचारला होता हा झाला चित्रपटाच्या क्लायमॅक्सचा भाग प्रत्यक्षात सातारा जिल्ह्याच्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीमध्ये अमली पदार्थांची लागवड बारबालांच्या नावाखाली अमली पदार्थांच्या पार्ट्या हे वाढते प्रस्थ सातारा जिल्ह्याच्या पर्यटनाला व एकूणच विकासाला मानवणारे नाही महाबळेश्वर व कोयना खोऱ्याचा एक शाश्वत विकास हे स्वप्न मुख्यमंत्र्यांनी पाहिले आहे या स्वप्नाला असे विकृतीचे ग्रहण लागू नये इतकीच अपेक्षा आहे मुख्यमंत्र्यांनी चित्रपटात दिघे साहेबांनी उच्चारल्याप्रमाणे एकनाथ कुठे आहे हे वाक्य गृहीत धरले तर खरोखरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या कारवाया रोखण्यासाठी कुठे आहेत तर सध्या मराठा आरक्षणाचा गुंता सोडवण्यासाठी ते भरघोस प्रयत्न करत आहेत मात्र आपल्या जिल्ह्यात सुरू असलेला विकृतीचा नंगानाचत्यांनी कायदेशीर मार्ग वापरून ताबडतोब थांबवला पाहिजे मुख्यमंत्र्यांचा जिल्हा म्हणून सातारा जिल्ह्याकडे कायमच वेगळ्या अपेक्षेने पाहिले जाते या जिल्ह्यात काम कमी आणि सरकारी सायरन वाजवणारे नेते जोशात असल्याने प्रत्यक्षात काहीच काम होत नसल्याची तक्रार आहे ज्यांना दोन जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळाले त्यांनी जिल्ह्यात कामाचा काय दिवा लागला हे सामान्य सातारकर हे सांगू शकतो मात्र एकनाथ शिंदे यांना सातारा जिल्ह्याचा अपेक्षित असणारा विकास अजूनही सत्यात आलेलं नाही त्याचीही सुरुवात झालेली आहे बारबालांच्या प्रकरणांमध्ये पोलिसांची बोट चे पेपणाची भूमिका अडचणीत आणणारी ठरू शकते साताऱ्यातील कास पठारावरील हॉटेल व्यवसायिकांची लॉबी राजकीय वरदहस्ताने समृद्ध आहे मात्र वरदहस्त म्हणजे कायद्याची पायमल्ली नव्हे किंवा म्हातारी मेल्याचे दुःख नाही काळसोकवता कामा नये बारबालांचे समर्थन करणारे राजकीय नमुने कायद्याने शोधून त्यांना कठोर हिसका दाखवलाच पाहिजे मुख्यमंत्र्यांनी सातारा जिल्ह्याचा भूमिपुत्र म्हणून ही जबाबदारी नक्कीच पार पाडावी म्हणजे एकनाथ कुठे आहे असा प्रश्न विचारण्याची वेळ येणार नाही