ना.कै.बाळासाहेब देसाई यांचे सातारा जिल्हा मुख्यालयाचे ठिकाणी प्रेरणादायी स्मारक उभारण्यासाठी आपण स्वतः पुढाकार घेणार आहे. याकामी जरुर त्या संबंधीतांशी चर्चा करुन, स्मारकाचे ठिकाण एकमताने निश्चित केले जाईल. लोकनेते कै. ना.बाळासाहेब देसाई यांच्या महान कार्यास साजेल असे स्मारक उभारण्यासाठी जी कार्यवाही करणे आवश्यक असेल ती आम्ही निश्चित करु असे आश्वासक उद्गार आज खा श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी जलमंदिर पॅलेस येथे व्यक्त केले.
याबाबत माहीती देताना खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी स्पष्ट केले आहे की,महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन महसूल मंत्री आदरणीय स्व.बाळासाहेब देसाई यांनी, त्यांच्या मंत्रीपदाच्या कार्यकाळातअत्यंत धाडसाने आणि अतिव सामाजिक तळमळीतुन निर्णय घेवून, संपूर्ण राज्यभरात लोकहिताची विविध
सामाजिक कामे हातावेगळी केली. त्यांचा प्रश्न सोडवण्याचा सौ सुनारकी एक लोहार असा हातखंडा विशेष प्रसिध्द होता. ना.कै.बाळासाहेब देसाई यांचे एकूणच सामाजिक आणि राजकीय कार्य अत्यंत उत्तुंग असे होते व आहे.म्हणूनच त्यांना लोकनेते ही बिरुदावली समाजाने बहाल केली. स्वतंत्र भारतात लोकनेता ही बिरुदावली प्राप्त करणारे एकमेव व्यक्तीमत्व म्हणून ना. कै.बाळासाहेब देसाई यांचेकडे पाहीले जाते.असे विलक्षण अलौकिक व्यक्तीमत्व लाभलेल्या कै. ना. बाळासाहेब देसाई यांचे सातारा या जिल्हयाच्या मुख्यालयाचे ठिकाणी साकारणा-या नियोजित स्मारकाचा विषय विवादीत न होता तो एकमताने पूर्णत्वास जाणे गरजेचे आहे. जिल्हयाचे पालक मंत्री आणि लोकनेते कै. ना. बाळासाहेब देसाई यांचे नातु, ना. शंभुराज देसाई यांचेसह सर्व संबंधीत लोकप्रतिनिधी, पक्षनेते, संघटना आदींशी आम्ही स्वतः विचारविनिमय करुन,स्मारकाचेठिकाण सुनिश्चित करण्यासाठी पुढाकार घेणार आहोत.लोकनेते स्व.बाळासाहेब देसाई हे सातारा जिल्हयाचे सुपूत्र होते.जिल्हया तील हजारो घरांमध्ये त्यांचे प्रतिमा पूजन केल्याशिवाय लोकांचा दिनक्रम सुरु होत नाही इतका ऋणानुबंध जिल्हावासियांच्या मनामध्ये आहे.अश्या उत्तुग व्यक्तीमत्वाचे स्मारक सातारा या जिल्हा मुख्यालयाचे ठिकाणी उभारण्यासाठी आम्ही स्वतःपुढाकार घेवू. त्याकरीता जे काही करायला लागेल ते सर्वांच्या प्रयत्नामधुन केले जाईल असे देखिल खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी शेवटी नमुद केले आहे.