सातारा दि… अजित जगताप
: गेली महिनाभर पावसाने दांडी मारली होती. त्यामुळे दिवसभर कडक उन्हाळा आणि रात्री थंडीची चाहूल असे वातावरण होते. परंतु अखेर वरण राजाला दया आली .आणि त्याने धरणी मातेची भेट घेतली.
आज सकाळपासूनच सातारा शहर परिसरात ढगाळ वातावरण होते. सकाळी पाऊस पडेल अशी चिन्ह दिसत होती. त्यानंतर साडेदहा वाजता पावसाची रिमझिम सुरू झाली. नोकरी व्यवसाय निमित्त घराबाहेर पडणाऱ्यांची खूपच प्रारंभ उडाली. दिवाळीच्या सणा निमित्त आपली ही दिवाळी चांगली व्हावी. याची प्रतीक्षा करणारे किरकोळ आकाश कंदील, मातीचे दिवे, किल्ले तसेच फटाके, चित्र अशा विविध प्रकारच्या वस्तू घेऊन अनेक विक्रेते रस्त्याच्या दुतर्फी बसले होते. दोन महिन्यापासून व्याजाने कर्ज काढून काही किरकोळ विक्रेते वस्तू खरेदी करून ते विक्रीसाठी रस्त्याच्या दुतर्फी मांडत असतात. पण ,अचानक कोसळणाऱ्या पावसामुळे अनेकांची धांदल उडाली.
पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यानंतर काही शेतकरी संघटना व राजकीय पक्ष नुकसान भरपाईची मागणी करतात. त्यामधून आपले राजकारण करतात. पण, हातावर पोट असणारे सर्वसामान्य विक्रेते यांच्या स्वप्नाची रांगोळी नष्ट झालेली आहे. प्रत्येकी किमान पाच ते पन्नास हजार रुपयांचे नुकसान झाले असले तरी त्यांना कोणी वाली नाही. त्यामुळे त्यांचे पंचनामे सुद्धा होऊ शकत नाही. हीच लोकशाही मधली मोठी शोकांतिका आहे. याबाबत आता सर्वसामान्य जनता दिवाळी करण्याचे उत्पन्नाचे साधन आहे. त्या लोकांनी अशा लहान व किरकोळ विक्रेत्यांकडे एखादी वस्तू घेताना कमी जास्त दर करू नये. अशी विनंती सर्वसामान्य माणसांना केंद्रबिंदू मानून राजकारण करणाऱ्या वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केलेली आहे.
या पावसामुळे वातावरणात गारवा असून पावसाच्या प्रतीक्षेत असणाऱ्यांना
खूप मोठा आनंद झाला आहे . आता त्याच्या सेलिब्रेशन ची तयारी जोमात सुरू झालेली आहे. कुणाला कशाचं तर बेवड्याला बाटलीचे ही जी म्हणी आहे. ती सातारा शहरातील अनेक दुकानात दिसून येऊ लागलेली आहे. पाटण कराड भागामध्ये पावसाच्या मुळे ऊसतोड कामगारांचे संसार उघड्यावर पडलेले आहेत त्यांच्या संसाराचा पाणी झालं सर्व कुटुंब आता मदतीच्या प्रतीक्षेत आहे दरम्यान, या पावसामुळे कराड, पाटण, जावली, सातारा, महाबळेश्वर तसेच कोरेगाव ,फलटण भागातील काही ठिकाणी पाऊस सुरू झाल्याने रेनकोट व छत्री पुन्हा एकदा रस्त्यावर दिसू लागलेली आहे.