Wednesday, April 22, 2026
spot_img
Home Politics|Satara District Satara City छ उदयनराजे मित्र समूहाच्या वतीने किल्ले स्पर्धांचे आयोजन

छ उदयनराजे मित्र समूहाच्या वतीने किल्ले स्पर्धांचे आयोजन

636
Adv

शिवराज्याभिषेक दिनाच्या साडेतीनशेव्या सोहळ्यानिमित्त खासदार उदयनराजे भोसले मित्र समूहाच्या वतीने भव्य ऐतिहासिक किल्ले स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे ही स्पर्धा समूह गट वैयक्तिक मोठा गट, आणि वैयक्तिक छोटा गट अशा तीन विभागात आयोजित करण्यात आली आहे आजच्या पिढीला किल्ल्यांचे ऐतिहासिक महत्त्व समजावे आणि तो वारसा त्यांनी जपावा या हेतूने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे

समूह गटासाठी दहा हजार ते 2000 अशी रोख बक्षिसे ठेवण्यात आली असून वैयक्तिक मोठ्या गटात प्रथम पारितोषिक सायकल द्वितीय पारितोषिक कॅरम बोर्ड तृतीय पारितोषिक क्रिकेट बॅट व कीट व उत्तेजनार्थ म्हणून आकर्षक मावळा गेम दिली जाणार आहे तर वैयक्तिक छोट्या गटात प्रथम पारितोषिक सायकल ,द्वितीय बक्षीस कॅरम बोर्ड ,तृतीय पारितोषिक क्रिकेट बॅट उत्तेजनार्थ म्हणून मावळा गेम दिली जाणार आहे

किल्ला स्पर्धेसाठी प्रवेश विनामूल्य असून दिनांक 11 नोव्हेंबर पूर्वी नाव नोंदणी करणे आवश्यक आहे किल्ल्याची बांधणी परीक्षणा पूर्वी पूर्ण असावी किल्ल्याची थोडक्यात माहिती परीक्षकांसमोर स्पर्धकांनी द्यावी नाव नोंदणी करताना पत्ता व माहिती तिचे ठिकाण अचूक सांगावे ही स्पर्धा सातारा शहरापुरती मर्यादित आहे किल्ले परीक्षण दिनांक 13 व 14 नोव्हेंबर रोजी होणार असून परीक्षकांचा निर्णय अंतिम ठेवण्यात आला आहे अधिक माहितीसाठी 9028719001, 9545 230582, 9763976359 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे

Adv