सातारा जिल्ह्यातील दुष्काळाकडे मुख्यमंत्री यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष?

319
Adv

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोन दिवस आपल्या दरे या गावी आले होते मात्र सातारा जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आपलीच शेती प्यारी वाटली असल्याचे दिसून आल्याने जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी आपली नाराजी दर्शविली आहे

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री असून फक्त स्वतःच्या शेतात लक्ष दिल्याने दुष्काळ सदृश्य तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लक्ष देणार कधी हा खरा प्रश्न निर्माण झाला आहे

महाराष्ट्राचा विचार केला तर सातारा जिल्ह्याचे सुपुत्र शरद पवार
बाबासाहेब भोसले,पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्रीपद भूषवलेले असून जिल्ह्याच्या विकासासाठी हे मुख्यमंत्री अकार्यक्षम ठरलेले आहेत राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या कराड तालुक्याकडेच मुख्यमंत्री असताना झूकते माप दिले माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची रीघ आता राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे ओढताना दिसत आहेत हेलिकॉप्टरने स्वतःच्या गावी उतरून शेती करायची काही तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतात पडलेल्या दुष्काळाकडे मात्र दुर्लक्ष करून पुन्हा त्याच हेलिकॉप्टरने मुंबईकडे जायचे हे काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पचले नसून मुख्यमंत्री महाराष्ट्राचेकि दरेगावचे हा प्रश्न आता शेतकऱ्यांपुढे उभा ठाकला आहे

Adv