Monday, April 20, 2026
spot_img
Home Politics|Satara District Satara City राज्य विक्रीकर निरीक्षक लाच लुचपतच्या जाळ्यात

राज्य विक्रीकर निरीक्षक लाच लुचपतच्या जाळ्यात

166
Adv

सातारा येथील वस्तू सेवाभावनातील दोन राज्य कर निरीक्षकांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून पकडले त्यांना 25 हजाराची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे रोहन सतीश देवकर राहणार मागील विहिरी जवळ मुक्काम पोस्ट देगाव तालुका वाई अक्षय मोहन फडतरे राहणार मागील विहिरीजवळ मुक्काम पोस्ट देगाव तालुका सातारा असे या निरीक्षकांचे नाव आहे

जीएसटी टॅक्स मधील टूबी आणि थ्री बी क्लास मधील दंडावरील व्याज माफ करून देण्यासाठी लाच घेतल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे तक्रारदार यांनी 2022 23 रोजी भरलेल्या जीएसटी शीर्षकात काही रकमेचा फरक पडला त्यामुळे त्यांना दंड झाला या दंडावरील व्याज माफ करून घेण्यासाठी त्यांनी जीएसटी ऑफिस सातारा येथे राज्यकर निरीक्षकांकडे अर्ज केला होता निरीक्षकांनी या कामाच्या संदर्भात त्यांना 30000 रुपये लाच मागितली तडजोडी आणती 20 हजार रुपये देण्याचे ठरले तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपाध्यक्ष राजेश वाघमारे यांच्याकडे तक्रार नोंदवली त्यानुसार पोलीस निरीक्षक सुनील पाटील निलेश राजपुरे गणेश ताटे निलेश चव्हाण अजय देशमुख या पथकाने विक्रीकर सेवाभावनाच्या परिसरात सापळा रचला आणि देवकर व फडतरे या करनिरीक्षकांना वीस हजाराची लाच घेताना रंगेहात पकडले या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती .

Adv