देशभरात दीपावली सणाला उत्साहात प्रारंभ झाला आहे. यंदाही नेहमीप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी आपली दिवाळी अहाेरात्र देशसेवेसाठी कार्यरत असणार्या जवानांबराेबर साजरी केली.
देशातील आमच्या सर्व कुटुंबियांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. हा सण सर्वांच्या आयुष्यात आनंद, समृद्धी आणि अद्भुत आरोग्य घेऊन येवो, अशा शभेच्छा पीएम मोदी यांनी आपल्या सर्व देशवासियांना दिल्या आहेत
आतापर्यंत ‘या’ जवानांसोबत साजरी केली दिवाळी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ मध्ये जगातील सर्वात उंच युद्धभूमी सियाचीन, २०१५ मध्ये पंजाबमधील अमृतसर आणि २०१६ मध्ये हिमाचल प्रदेशातील किन्नौर येथील सैनिकांसोबत दिवाळी साजरी केली होती. २०१७ मध्ये जम्मू-काश्मीरमधील गुरेझ, २०१८ मध्ये उत्तराखंडमधील केदारनाथ आणि २०१९ मध्ये जम्मू विभागातील राजोरी येथे लष्कराच्या जवानांसोबत दिवाळी साजरी केली. तर पंतप्रधानांनी २०२० मध्ये राजस्थानमधील जैसलमेरमध्ये, २०२१ मध्ये जम्मू विभागातील राजोरी जिल्ह्यातील नौशहरा येथे आणि २०२२ मध्ये लडाखच्या केंद्रशासित प्रदेशातील कारगिलमध्ये दिवाळी सण साजरी केली. दरम्यान सीमा आणि नियंत्रण रेषेवरील अविरत कार्यरत अनेक भारतीय जवानांना पीएम यांनी भेट घेत प्रेरणा दिली आहे.