लोकसेवा केंद्राकडून गरजूंना मदतीचा हात: संग्राम बर्गे

303
Adv

खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली निराधारांना आधार देण्याचे काम अविरतपणे सुरू आहे

जास्तीजास्त नागरिकांनी यांचा लाभ घ्यावा असे आवाहन युवा नेते संग्राम बर्गे यांनी केले आहे श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले मित्र समूह आणि संग्राम बर्गे लोकसेवा केंद्र यांच्या वतीने विलासपूर व गोळीबार मैदान परिसरातील अनाथ, निराधार, वंचित घटकांना शासकीय योजनेच्या माध्यमातून मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातात.

याच माध्यमातून आज श्रीमती सुनीता पवार, निर्मला चव्हाण, सुनील नलवडे, शालन पवार, मीनाक्षी डांगरे, अनारकली पठाण, यांना विविध शासकीय योजनेच्या मंजुरीचे पत्र श्री किरण नलवडे, श्री आबा शिंदे, श्री उदय मराठे, यांच्या हस्ते आज देण्यात आले, आज अखेर विविध शासकीय योजनेतून विलासपूर गोळीबार मैदान परिसरातील 24 पेक्षा जास्त गरजू लाभार्थ्यांना शासनाचा विविध पेन्शन योजनांचा लाभ झाला आहे यावेळी उपस्थित कृष्णात नलवडे, महेश चौगुले, संजय चव्हाण, मुकुंद देवकर, अमोल करडे, हर्षद शेख, सुरेश शिंदे, अमीर धोत्रे, अमोल कुराडे, अरविंद पवार, सचिन देवकर.
गरजू नागरिकांनी लोकसेवा केंद्र येथे संपर्क साधून विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले

Adv