Tuesday, April 21, 2026
spot_img
Home Politics|Satara District Satara City पवार कुटुंबीय बारामतीत दिवाळी करता एकत्र

पवार कुटुंबीय बारामतीत दिवाळी करता एकत्र

245
Adv

पवार कुटुंबीय बारामतीत दिवाळी करता एकत्र आलेलं पाहायला मिळालं.उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीतील शारदोत्सव कार्यक्रमाला हजेरी लावली.

बारामतीतील विद्या प्रतिष्ठान येथील गदिमा सभागृहात संगीत गाण्यांचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार एकाच मंचावर आले. यावेळी बहीणभावांचं बाँडींगही पाहायला मिळालं. दिवाळीत लोकांच्या गाठीभेटी घेणार नाही, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं होतं. परंतु, बारामतीतील शारदोत्सवाला अजित पवारांनी लावली हजेरी. मास्क घालून अजित पवार कार्यक्रमात बसले होते. विद्या प्रतिष्ठानच्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीला अजित पवार गैरहजर होते.

बहीण भाऊ एकाच मंचावर
दिल्लीत अमित शाहांची भेट घेतल्यानंतर अजित पवारांनी थेट बारामती गाठली. आणि त्यानंतर बारामतीत खासदार सुप्रिया सुळे आणि अजित पवार एकाच मंचावर आले आहेत. बारामतीतील विद्या प्रतिष्ठाने येथील गदिमा सभागृहात दिवाळी निमित्ताने शारदोत्सव एकत्र आले आहेत. दरवर्षी दिवाळीच्या निमित्ताने बारामतीतील गदिमा सभागृहात शारदोत्सवाचे आयोजन करण्यात येत असते. यंदाच्या वर्षी बेला शेंडे यांच्या गाण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याच दरम्यान सत्कार करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सुप्रिया सुळे एकाच मंचावर आले. या शारदोत्सवाला शरद पवार देखील हजरी लावणार होते. परंतु, तब्येतीच्या कारणास्तव ते कार्यक्रमाला येऊ शकले नाहीत. परंतु अजित पवारांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली.

Adv