चिंचणेर वंदन नगरीत जावई सन्मान सोहळा उत्साहात संपन्न..

736
Adv

चिंचणेर वंदन नगरीत जावई सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला संपूर्ण जिल्ह्यातून ६०० हुन अधिक लोक या सोहळ्यात सहभागी झाले, येणाऱ्या प्रत्येक लेक जावयांस मानाचा फेटा,चांदीचे ताट निरंजन ,बत्तासे, आणि लेकीची आदरपूर्वक ओटी भरण्यात आली आणि खऱ्या अर्थाने अधिकमास सण लेक जावई कौतुकाचा मोठ्या थाटामाटात उत्साहात संपन्न झाला.

कार्यक्रमास चिंचणेर वंदन गावचे सन्माननीय जावई कोरेगाव खटाव मतदार संघाचे लोकनियुक्त देवदूत आमदार आदरणीय श्री महेशदादा शिंदे साहेब तसेच गावची लाडकी लेक आमदार साहेबांच्या सुविद्य पत्नी आदरणीय सौ प्रियाताई शिंदे यांच्या उपस्थितीत प्रथमतः जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिंचणेर वंदन च्या लहान बालगोपाळांनी भरवलेले *विज्ञान प्रदर्शन* उद्घाटन करण्यात आले. तद्नंतर ग्रामपंचायतीच्या वतीने बसविण्यात आलेल्या बहुप्रतीक्षित अशा *CCTV CAMERA* उद्घाटन करण्यात आले. तसेच १९७१ भारत पाक युद्धात शहीद जवान कै सुभेदार हणमंत राजाराम बर्गे यांच्या शिलालेखास पुष्पचक्र अर्पण करण्यात आले.

संपूर्ण गाव *बंदिस्त गटर ट्रीमीक्स काँक्रीट रस्ता* उद्घाटन करण्यात आले त्यानंतर आमदार साहेबांचे
“”जावई सन्मान सोहळा”” व्यासपीठावर आगमन झाले आदरणीय श्री संग्रामजी बर्गे दादा यांच्या अतिशय दिलखुलास भाषण झाले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाराष्ट्र भूषण संजय कुलकर्णी काका, संतोष बर्गे नाना यांनी केले.

Adv