यवतेश्वर येथील परिसरामध्ये दोन वाहनांच्या अपघातामध्ये सातारा पालिकेची तरुण कर्मचारी गायत्री दीपक आहेरराव हिचा अपघाती मृत्यू झाला. या मृत्यूबद्दल खासदार उदयनराजे भोसले यांनी फेसबुक वर आपली भावनिक पोस्ट करत आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली आहे . दिवंगत सहकारी मित्राच्या लेकीच्या मृत्यूची बातमी कळताच मनाला प्रचंड वेदना झाल्याचे सांगत आहेरराव कुटुंबाला दुःखातून सावरण्याचे बळ मिळो अशी प्रार्थना उदयनराजे यांनी केली आहे
उदयनराजे भोसले यांचे मित्र दीपक आहेरराव यांचे काही वर्षांपूर्वी अपघात निधन झालं त्यांच्या निधनानंतर आहेरराव यांच्या पत्नी ज्योती आहेरराव यांनी मोठ्या हिकमतीने कुटुंबाचा गाडा हाकला अतिशय गरीब परिस्थितीतून त्यांनी आपल्या मुलांना शिकवलं मात्र नियतीच्या खेळासमोर त्यांना हात टेकावेच लागले . गायत्री ही तीन वर्षांपूर्वी सातारा पालिकेच्या सेवेत रुजू झाली होती अंतर्गत लेखापरीक्षक विभागांमध्ये अत्यंत प्रामाणिकपणे सक्रिय होती .तिच्या अकाली निधनाचे वृत्त कळताच सातारा पालिकेच्या कर्मचाऱ्यांमधून हळहळ व्यक्त केली जात होती मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी सुद्धा या अपघाती मृत्यूबद्दल तीव्र शोक व्यक्त केला या घटनेने आहेरराव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळाला आहे
उदयनराजे भोसले यांनी फेसबुक वर भावनिक मजकूर प्रसिद्ध केला ते म्हणतात आमचे निकटवर्ती मित्र कैलासवासी दीपक आहे राव यांची सुकन्या गायत्री दीपक आहेरराव हिचा काल दुर्दैवाबद्दल मृत्यू झाला . हे समजल्यानंतर मनाला प्रचंड वेदना झाल्या भूतकाळातील आणि घटना वेगाने डोळ्यासमोर तळून गेल्या .आहेरराव परिवाराशी आमचा अत्यंत कनिष्ठ ऋणानुबंध आहे ज्योती वहिनींना हे दुःख सावरण्याचे बळ परमेश्वर देवो . त्यांनी अत्यंत कष्टातून मुलांना मोठे करून आपल्या पायावर उभे केले होते त्यांच्यासाठी आज काय भावना व्यक्त कराव्यात हेच समजत नाहीत आम्ही निशब्द आहोत तिच्या दुर्दैवी मृत्यूची सल कायम आमच्या मनात टोचत राहील अशा भावना उदयनराजे यांनी व्यक्त केल्या आहेत