सोनके-करंजखोप मार्गावरील सोनके गावाच्या हद्दीत ऊसाचा ट्रेलर व दुचाकीच्या अपघातात दुचाकीस्वार संजय रामचंद्र भोईटे वय ३७ जागीच ठार झाला.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार सोनके-करंजखोप रस्त्यावरील सोनके गावाच्या हद्दीत वसना नदीवरील पुलाच्या जवळ करंजखोपहून ऊस घेऊन जाणाऱ्या ट्रक्टर क्रमांक MH-11 BA2826 व सोनकेकडून करंजखोपकडे जाणाऱ्या दुचाकी MH-50 j341 अपघातात दुचाकीस्वार संजय रामचंद्र भोईटे वय ३५ रा. तडवळे संमत वाघोली यांची मागिल ट्रेलरला धडक बसल्याने दुचाकी घसरून ट्रेलरच्या मागिल चाकाखाली सापडल्याने ते जागीच ठार झाले.