Saturday, July 25, 2026
spot_img
Home Politics|Satara District Satara City संगम माहुलीतील महापुरातही छत्रपती शाहू महाराजांची समाधी अबाधित

संगम माहुलीतील महापुरातही छत्रपती शाहू महाराजांची समाधी अबाधित

46
Adv

सातारा : संगम माहुली येथे कृष्णा आणि वेण्णा नद्यांना आलेल्या महापुरामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही छत्रपती थोरले शाहू महाराज यांच्या समाधीला पाण्याचा वेढा पडला. पुराच्या प्रचंड प्रवाहात वाहत आलेल्या सुमारे १,००० किलोपेक्षा अधिक वजनाच्या महाकाय झाडाने समाधीला जोरदार धडक दिली. मात्र या धडकेमुळे समाधीचा एकही दगड हलला नाही. उलट महाकाय झाडाचेच तुकडे झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
दरम्यान, आज पुन्हा एक झाड पुराच्या प्रवाहातून वाहत येऊन समाधीला धडकल्याची माहिती समोर आली आहे. सलग दोन दिवस अशा घटना घडूनही समाधीला कोणतीही मोठी हानी झालेली नसल्याचे दिसून येत आहे.
या घटनेमुळे ऐतिहासिक वारशाच्या भक्कम बांधकामाची पुन्हा एकदा प्रचिती आल्याची भावना अनेक नागरिक व्यक्त करत आहेत. महापुरासारख्या नैसर्गिक संकटातही शतकानुशतके उभी असलेली ही वास्तू आजही तितक्याच मजबुतीने उभी असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.
स्थानिक नागरिकांनी प्रशासनाने पुराचे पाणी ओसरल्यानंतर समाधी परिसराची सविस्तर पाहणी करून आवश्यक दुरुस्ती व संवर्धनाची कामे तातडीने हाती घ्यावीत, अशी मागणी केली आहे.

Adv