Tuesday, June 23, 2026
spot_img
Home Latest News Politics|Satara District विधान परिषद निवडणुक मंत्री जयकुमार गोरे यांचे राजकीय वजन वाढले

विधान परिषद निवडणुक मंत्री जयकुमार गोरे यांचे राजकीय वजन वाढले

64
Adv

सोलापूर–सातारा विधान परिषद निवडणुकीचा निकाल दोन उमेदवारांच्या विजय-पराभवाचा असला तरी राजकीय विश्लेषकांच्या मते खरी परीक्षा मंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाची आणि संघटन कौशल्याची होती

या निकालामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गोटातही जयकुमार गोरे यांचे राजकीय वजन वाढल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. उमेदवारांच्या विजयाबरोबरच नेतृत्वाची क्षमता, कार्यकर्त्यांमधील समन्वय आणि निर्णयक्षमतेचीही परीक्षा या निवडणुकीत झाली आणि त्यात गोरे यांनी आपली प्रभावी भूमिका बजावल्याचे समर्थकांचे मत आहे.

निवडणुकीच्या संपूर्ण प्रक्रियेत जयकुमार गोरे यांनी समन्वयकाची भूमिका प्रभावीपणे पार पाडत महायुतीच्या रणनीतीला धार दिली. मतदारांशी सातत्याने संपर्क, कार्यकर्त्यांचे नियोजन आणि नेतृत्वाचा ठसा यामुळे त्यांच्या राजकीय वजनात आणखी भर पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

या निकालानंतर पश्चिम महाराष्ट्रातील महायुतीच्या राजकारणात जयकुमार गोरे यांचे स्थान अधिक मजबूत झाल्याचे बोलले जात आहे. राजकीय आव्हानांचा सामना करत त्यांनी विजयाचा षटकार लगावला आणि प्रभावी नेतृत्वाची छाप उमटवली, अशी प्रतिक्रिया समर्थकांकडून व्यक्त होत आहे.
या विजयामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि इतर निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्रात जयकुमार गोरे यांची भूमिका अधिक महत्त्वाची ठरणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे.

Adv