Saturday, August 8, 2026
spot_img
Home Latest News Politics|Satara District लोकसभा निवडणुकीपूर्वी राहिलेले जॅकेटचे स्वप्न अखेर पूर्ण!

लोकसभा निवडणुकीपूर्वी राहिलेले जॅकेटचे स्वप्न अखेर पूर्ण!

163
Adv

सातारा : सातारा-सांगली विधान परिषद निवडणुकीत विजय मिळवत आमदारपदी विराजमान झालेल्या नूतन आमदार धैर्यशील कदम यांच्या राजकीय प्रवासाइतकीच त्यांच्या वेगळ्या शैलीचीही चर्चा रंगू लागली आहे. आमदार झाल्यानंतर त्यांनी प्रथमच परिधान केलेल्या जॅकेटने विधानभवनापासून सातारा जिल्ह्यापर्यंत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

राजकीय वर्तुळात अशी चर्चा आहे की, लोकसभा निवडणुकी च्या काळात जॅकेट परिधान करण्याची इच्छा असूनही त्यांनी ती पूर्ण केली नव्हती. मात्र आमदारकीची शपथ आणि विजयाचा आनंद साजरा करताना त्यांनी अखेर जॅकेट परिधान करून हे स्वप्न पूर्ण केले.धैर्यशील कदम यांच्या या नव्या लूकची सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू असून समर्थकांकडून त्याचे स्वागत केले जात आहे. “नवा आमदार, नवी जबाबदारी आणि नवा अंदाज” अशा प्रतिक्रिया उमटत आहेत.

राजकारणात कामगिरीसोबतच व्यक्तिमत्त्व आणि सादरीकरणालाही महत्त्व असते. त्यामुळे धैर्यशील कदम यांच्या जॅकेटची चर्चा सध्या विधानभवनापासून सातारा जिल्ह्यापर्यंत रंगलेली दिसत आहे.

Adv