Tuesday, April 21, 2026
spot_img
Home Politics|Satara District Satara City शिवजयंतीकडे भाजप सहित 45 नगरसेवकांची पाठ?

शिवजयंतीकडे भाजप सहित 45 नगरसेवकांची पाठ?

114
Adv

ऐतिहासिक राजधानी साताऱ्यात शिवजयंती साजरी झाली मात्र तब्बल भाजपच्या 45 नगरसेवकांनी याकडे पाठ फिरवली असल्याचे दिसून आले त्याला कारणही तसे होते की पालिका कर्मचारी नगरसेवक सोडून काही जणांचा हस्तक्षेप

नगराध्यक्ष अमोल मोहिते व उपनगराध्यक्ष दत्तात्रय बनकर यांनी पालिकेच्या कारभारात बाहेरच्या व्यक्तींचा हस्तक्षेप टाळणे गरजेचे असून असेच जर चालत राहिले तर पालिकेचे कामकाज सुरळीत होणार नाही व गालबोट लागत राहणार हे त्रिवार सत्य

सातारा पालिकेच्या माध्यमातून शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली मशाल महोत्सव मिरवणूक आधी कार्यक्रम मोठ्या गर्दीत थाटात साजरे झाले असले तरी या कार्यक्रमांकडे दोन्ही नेत्यांच्या नगरसेवकांनी सपशेल पाठ फिरवली असल्याचे दिसून आले

लाखो रुपयांचा निधी पालिकेने यासाठी खर्च केला मात्र नगरसेवकच न फिरकल्याने मोठे आश्चर्य व्यक्त केले जात आहे भाजपचे नगरसेवकांनी यानी कार्यक्रमाकडे पाठ फिरवल्याने एक उलट सुलट चर्चा रंगत आहे

Adv