Wednesday, July 22, 2026
spot_img
Home Politics|Satara District Satara City माणिकराव कोकाटेंचे मंत्रिपद वाचले

माणिकराव कोकाटेंचे मंत्रिपद वाचले

413
Adv

कृषिमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सत्र न्यायालयाने दिलेल्या दोन वर्षांच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे. मंत्री कोकाटे यांनी शिक्षेसा स्थगिती मिळावी यासाठी सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता.

नेमकं प्रकरण काय?

1995 ते 1997 सालचं हे प्रकरण असून, कागदपत्रं फेरफार आणि फसवणूक केल्याचा आरोप करत माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात दावा दाखल केला होता. माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू सुनील कोकाटे यांनी शासनाकडून ज्या सदनिका मिळतात, त्या सदनिका घेतल्या होत्या.

त्यावेळेस त्यांनी सांगितलेलं होतं की, आमचं उत्पन्न कमी आहे आणि आम्हाला दुसरं घर नाहीये, अशा स्वरूपाची माहिती त्यांनी दिलेली होती. त्या सदनिका त्यांना शासनाच्या माध्यमातून मिळालेल्या होत्या. मात्र त्यावेळी तत्कालीन अधिकाऱ्यांनी या संदर्भातील तक्रार केलेली होती. 1995 साली कोकाटे हे आमदार होते तर, दिघोळे हे मंत्री होते. गेल्या अनेक वर्षांपासून दिघोळे आणि कोकाटे यांच्यामध्ये हा वाद सुरू होता.

Adv