अनधिकृत बांधकामांचा म्होरक्या ठाण्यात राहतो, असा गंभीर आरोप मनसेचे नेते राजू पाटील यांनी एकनाथ शिंदे यांचं नाव न घेता केला आहे. पालिका अधिकारी, रजिस्ट्रेशन ऑफिसचे, बँकांचे अधिकारी यात समील आहेत. सर्च रिपोर्ट असल्याशिवाय हे करु शकत नाही. आर्थिक हितसंबंध जोपासताना त्यांना अभय देण्याचे काम इथला लोकल कोणी करु शकत नाहीत. ते ठाणेवाले करतात, असा माझा स्पष्ट आरोप असल्याचे मनसेने नेते राजू पाटील यांनी सांगितले. शिंदे पिता – पुत्रांचे नाव न घेता मनसे नेते पाटील यांनी हा गंभीर आरोप केला आहे.
पाटील यांनी सांगितले की, एखाद्या सेलिब्रेटीवर काही प्रसंग आला, तर त्याला भेटायला जायलाच पाहिजे. पण कल्याण – डोंबिवलीतील लोक मरताहेत. दिव्याला काही लोक रॉकेल घेऊन बसले आहेत, पालकमंत्री आणि नगरविकास खात्याचे मंत्री आहेत. त्यांनी इथे येऊन लोकांना भेटायला पाहिजे. गंगेत डुबकी मारुन पाप घुतले जाते. इथे पुण्य जास्त मिळेल, इथे पालकमंत्री आहेत. नगरविकास खाते त्यांचे आहे. त्यांचा मुलगा खासदार आहे, अशा शब्दांत त्यांनी नागरिकांच्या प्रश्नाकडे लक्ष देण्याचं म्हणत उपमुख्यमंत्र्यांना टोला लगावला.