Sunday, May 31, 2026
spot_img
Home Politics|Satara District Satara City नगरसेविका पूनम गणेश निकम यांच्या तत्परतेने विलासपूर परिसरातील विकासकामांना गती

नगरसेविका पूनम गणेश निकम यांच्या तत्परतेने विलासपूर परिसरातील विकासकामांना गती

187
Adv

सातारा शहरातील विलासपूर, गोळीबार मैदान, मोरे कॉलनी व कुंभारवाडा परिसरातील विकासकामांना वेग आला असून मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेविका पूनमताई गणेश निकम सातत्याने नागरिकांच्या प्रश्नांवर काम करत आहेत.

सातारा शहरातील विलासपूर,गोळीबार मैदान परिसरातील नागरिकांच्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या समस्यांची दखल घेत नगरसेविका पूनमताई गणेश निकम यांनी तत्परतेने विकासकामे मार्गी लावली आहेत.

मोरे कॉलनी व कुंभारवाडा परिसरातील साचलेला नाला स्वच्छ करण्यात आला असून पावसाळ्यात नागरिकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी पाइप टाकण्यात आले आहेत. तसेच ये-जा करण्यासाठीचा मार्गही व्यवस्थित करून नागरिकांची गैरसोय दूर करण्यात आली आहे.
या कामांमुळे परिसरातील स्वच्छता, वाहतूक व नागरिकांची सुरक्षितता यामध्ये मोठी सुधारणा झाली असून स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. विकासकामांबाबत सातत्याने पाठपुरावा करून नागरिकांच्या समस्या सोडविणाऱ्या नगरसेविका पूनमताई गणेश निकम यांच्या कार्याचे परिसरातून कौतुक होत आहे.
“नागरिकांच्या समस्या सोडविणे हेच माझे प्राधान्य असून परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी माझे प्रयत्न यापुढेही सुरू राहतील,” अशी भावना नगरसेविका पूनमताई गणेश निकम यांनी व्यक्त केली.
मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनातून नागरिकांच्या विकासासाठी कटिबद्ध राहून प्रत्येक समस्या सोडविण्याचा प्रयत्न सुरू आहे,” असे पूनमताई निकम यांनी सांगितले.

Adv