Monday, April 20, 2026
spot_img
Home Satara District Phaltan कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नका श्री रामराजे नाईक निंबाळकर

कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नका श्री रामराजे नाईक निंबाळकर

5513
Adv

श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या उपस्थितीत माढा लोकसभा मतदारसंघात मुंबईतील सागर बंगल्यावर बैठक झाली असून यासंदर्भात श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी आपले स्टेटस ठेवून खुलासा केला आहे

महाराष्ट्र राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री माननीय श्री अजित
दादा पवार व माननीय श्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी माढा
लोकसभा संदर्भात बैठकीत झाली यामध्ये महायुतीचा धर्म पाळावा अशी मला सूचना करण्यात आली परंतु मी माझे स्थानिक लेव्हलचे कार्यकर्त्यांशी व माढा लोकसभा मतदारसंघातील समविचारे नेते व कार्यकर्त्यांशी चर्चा करून मी निर्णय देईल असे सांगितले.

यावेळी माढा लोकसभा चे खा रणजितसिंह नाईकनिंबाळकर माण-खटाव चे आजयकुमार गोरे साताराजिल्हा परिषद मा.अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईकनिंबाळकर व फलटण परिषद चे माजी नगरसेवक अनिकेतराजे रामराजे नाईक निंबाळकर उपस्थित होते. या व्यतिरिक्त कोणतीही चर्चा झालेली नाही ॥कृपया अफवांवर विश्वास ठेवू नये. असा खुलासा श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी केला आहे

Adv