Monday, April 20, 2026
spot_img
Home Satara District Phaltan साताऱ्यापेक्षा माढ्यात राष्ट्रवादीच्या ताकत जास्त

साताऱ्यापेक्षा माढ्यात राष्ट्रवादीच्या ताकत जास्त

1329
Adv

लोकसभा निवडणुकीत सातारा लोकसभा मतदार संघापेक्षा माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे पारडे जड असल्याने माढा मतदारसंघ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळण्याचे संकेत मुंबईतील सूत्रांनी दिले आहेत

राष्ट्रवादी दोन गट पडल्यानंतर सातारा जिल्ह्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे एकमेव आमदार म्हणून मकरंद पाटील यांच्याकडे बघितले जाते सध्या सातारा लोकसभा मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवार गटाची ताकद ही कमी असून सातारा लोकसभा मतदारसंघ हा भाजपला सोडण्यास महायुतीत एकमत झाल्याचे समजते? सातारा जिल्ह्यात एकमेव आमदार असल्याने पक्षाची ताकत वाढवण्यास उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कुठे दिसली नाही सातारा जिल्ह्यात फक्त भारतीय जनता पार्टीचा बोलबाला दिसून येत असून माढा लोकसभा मतदारसंघात मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पारडे जड असल्याचे सध्याचे तरी चित्र आहे

माढा लोकसभा मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार दीपक चव्हाण, संजय शिंदे,बबनराव शिंदे हे तीन विद्यमान आमदार असून माढा लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी मिळण्यास अडचण नसल्याचे मुंबईतील सूत्रांनी सांगितले असून चित्र स्पष्ट होणार असून नक्की सातारा, माढातून उमेदवार कोण याची उत्सुकता शिगेला पोचली आहे

Adv