Wednesday, April 22, 2026
spot_img
Home Satara District Mahabaleshwar पोलादपूर- महाबळेश्वर रस्ता वाहतुकीस १५ दिवस बंद

पोलादपूर- महाबळेश्वर रस्ता वाहतुकीस १५ दिवस बंद

468
Adv

सातारा दि. २९: पोलादपूर महाबळेश्वर (आंबेनळी घाट) रस्ता हा सद्य:स्थितीत सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून वाहतुकीकरीता पुढील १५ दिवस पुर्ण बंद करण्याबाबत जिल्हादंडाधिकारी रायगड – अलिबाग यांनी निर्देश दिले आहेत. पोलादपूर महाबळेश्वर (आंबेनळी घाट) रस्ता सर्व प्रकारच्या वाहतूकीकरीता पुढील १५ दिवसांकरीता बंद करण्यात आलेला आहे.
याप्रकरणी पाऊस, भुस्खलन, दरड कोसळणे इत्यादी परिस्थितीबाबत वाहतुकीचा दर १५ दिवसांनी सविस्तर आढावा घेऊन हा घाट रस्ता बंद ठेवण्याच्या अनुषंगाने स्वयंस्पष्ट अहवाल दर १५ दिवसांनी पोलीस अधीक्षक कार्यालय रायगड अलिबाग व उपविभागीय अधिकारी महाड यांनी सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असे अपर जिल्हादंडाधिकारी रायगड- अलिबाग संदेश शिर्के यांनी कळविले आहे.

Adv