शेतकऱ्यांसाठी इर्मा योजना राज्य शासनाने लागू करावी खा उदयनराजे भोसले

720
Adv

राज्यामध्ये शेतक-यांच्या हितासाठी ईर्मा योजना लागु करावी या प्रमुख मागणीबरोबरच सर्व नागरीकांना शासकीय रुग्णालयामार्फत करण्यात येणारे वैद्यकिय उपचार मोफत केले जाण्यासाठी राज्य
सरकारने कार्यवाही करावी अशी मागणी आम्ही सर्वप्रथम कृषीरत्न,कृषी भूषण डॉ.बुधाजीराव मुळीक यांचेसमवेत भुमाता दिंडीच्या माध्यमातुन केली होती. आज राज्याच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत,सर्वसामान्य जनतेच्या हिताचा मोफत उपचाराचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे त्याबद्दल राज्यशासनाचे आम्ही
अभिनंदन करतो, त्यांचे जनतेच्या वतीने आभारही मानतो. त्याचबरोबर शेतक-यांना पिक लागवडीच्याखर्चासह उत्पन्नाची हमी देणारी ईर्मा योजना अमलात आणावी अशी अपेक्षा व्यक्त करतो असे उद्गार खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केले आहेत.

मुख्य मंत्री नामदार एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस आणि ना.अजित पवार यांच्यानेतृत्व खालील महाराष्ट्र शासनाने,शासकीय रुग्णालयातुन सर्वांना मोफत उपचार करण्याचा कालच्याबैठकीत निर्णय घेतला आहे. सदरचा निर्णय लवकरच घोषित करण्यात येणार आहे. शासकीय रुग्णालयातुन
मोफत उपचार केले गेले पाहीजेत, राज्यातील गोरगरिब तसेच सर्वच लोकांना कोणताही भेदभाव न करताउपचार मिळाले पाहीजेत या आमच्या मागणीला मंत्रीमंडळाच्या निर्णयामुळे यश आले आहे.या निर्णयाबद्दलमुख्यमंत्री,आणि दोन्ही उपमुख्य मंत्री यांचेसह संपूर्ण राज्य मंत्रीमंडळ त्रिवार अभिनंदनास पात्र ठरले
आहे. व्यक्तीश: आमच्या आणि तमाम जनतेच्या वतीने, तसेच डॉ. बुधाजीराव मुळीक आणि भुमातापरिवाराच्या वतीने राज्याचे मुख्य मंत्री ना. एकनाथ शिंदे, उपमुख्य मंत्री तथा गृहमंत्री ना. देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री ना.अजित पवार,आरोग्य मंत्री ना.तानाजी सावंत यांचेसह सर्व मंत्रीमंडळाचे
आम्ही मनापासून विशेष अभिनंदन करतो असे देखिल खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी नमुद केले आहे.

राज्यसरकार वेगवान आणि धाडसी निर्णय घेत आहेच,त्याच बरोबरीने मोठया प्रमाणात लोकहिताच्या विकास कामांना निधी उपलब्ध करुन देत आहे. महिला भगीनींसाठी 50 टक्के मोफत एसटी प्रवास योजनेचा माता भगिनींना चांगला लाभ मिळत आहे.महिला सक्षमीकरणासाठीही या निर्णयाची जोड
मिळत आहे.आता सर्वांनाच शासकीय रुग्णालयातुन मोफत वैद्यकिय उपचाराचा घेतलेला निर्णय निश्चितच सर्वसामान्य, गोरगरिबांसह राज्यातील सुमारे 60 टक्के लोकसंख्येला लाभदायी ठरणारा आहे. अश्याचप्रकारे शेतकरी हिताचा निर्णय ईर्मा योजना लागू करण्याचा आणि शेतीला उदयोगाचा दर्जा देणेबाबत घ्यावाअशी अपेक्षा आहे. यथावकाश तथापि लवकरच असा निर्णय घेतला जाईल असा विश्वास आहे. यानिर्णयामुळे शेतात राबणा-यां हातांमध्ये उत्पादन खर्चावर आधारित शेती उत्पन्नाची हमी मिळण्याबरोबरच ख-या अर्थाने राज्यशासन एक वेलफेअ रस्टेट म्हणून नव्या दृष्टीकोनामधुन ओळखले जाईल अश्या भावना देखिल खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केल्या आहेत.

Adv