महाराष्ट्राची कुस्ती परंपरा ही प्रगल्भ आणि बहुआयामी असून या परंपरेने जागतिक पातळीवर आपला झेंडा फडकवला आहे .पश्चिम महाराष्ट्रामध्ये सातारा ते कोल्हापूर हा पट्टा कुस्ती पंढरी ओळखला जातो या पंढरीतील नामवंत मल्लांना आंतरराष्ट्रीय सुविधा देण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून मुबलक निधी उपलब्ध करून देण्याचे स्पष्ट आश्वासन खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिले . कुस्तीची परंपरा जपण्यासाठी आपण कुठेही कमी पडणार नसल्याची ग्वाही त्यांनी दिली
उदयनराजे भोसले मित्र समूह व श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह उर्फ दादा महाराज तालीम संघ यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील यांना रॉयल एनफिल्ड बुलेट व उपमहाराष्ट्र केसरी विशाल बनकर यांना होंडा युनिकॉर्न तसेच पैलवान गणेश कुंकू ले आकाश माने सुमित गुजर यांना प्रत्येकी 51 हजार रुपये बक्षीस अशा बक्षीस वितरण कार्यक्रमाचे आयोजन जलमंदिर येथे करण्यात आले होते त्यावेळी खासदार उदयनराजे भोसले यांनी नामवंत पैलवानांचा सत्कार करून त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधला व्यासपीठावर तालीम संघाचे अमरदादा जाधव जिल्हा परिषद सदस्य सुनील काटकर, जितेंद्र सिंह खानविलकर काकासाहेब धुमाळ उद्योजक संग्राम बर्गे, पैलवान सचिन शेलार, नयन पाटील, सागर भोसले गणेश जाधव सौरभ सुपेकर इत्यादी यावेळी उपस्थित होते
खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले पुढे म्हणाले , “आपण माझा भाषणामध्ये उल्लेख दैवत असा केला मात्र मी तुमचा सहकारी आहे मित्र आहे . कुस्तीच्या पारंपारिक खेळा मध्ये येणाऱ्या अडचणी मला समजत आहेत . त्याकरिता जास्तीत जास्त सुविधा मला कशा उपलब्ध करून देता येईल याकरिता मी बांधील आहे . राजकारणात सर्व गोष्टी करता येतात मात्र राजकारण हे राजकारणाच्या जागीच असावं ते खेळा मध्ये येऊ नये राजकारण हे गजकरण झालेले आहे . त्यामुळे जोपर्यंत मी आहे तोपर्यंत मी जनतेचाच आहे श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह उर्फ दादा महाराज यांनी पैलवान श्रीरंग आप्पा जाधव यांच्या बरोबर कार्यरत असताना तालीम संघाच्या माध्यमातून कुस्ती परंपरा साठी मोठे सहकार्य केले ती जबाबदारी आता माझ्यावर असून पश्चिम माणसाच्या पट्ट्यातील नामवंत पैलवानांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा, आंतरराष्ट्रीय कोच, तसेच इतर अनुषंगिक बाबींसाठी सी एस आर व वेगवेगळे निधी स्वतः मी आणि माझ्या मित्रमंडळी च्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्यासाठी मी सातत्याने कटिबद्ध आहे .कुस्ती परंपरेचे वैभव पुढे नेण्यासाठी मला जे जे करणे शक्य आहे ते ते मी निश्चितच करण्यास कमी पडणार नाही . पैलवानांच्या वेगवेगळ्या कार्यक्रमासाठी आपले सातत्याने सहकार्य राहील अशी स्पष्ट ग्वाही उदयनराजे यांनी दिली
जलमंदिर येथे आयोजित कार्यक्रमांमध्ये मान्यवरांचे स्वागत हलगीच्या आणि तुतारीच्या निनादात झाले संचालक पैलवान तानाजीराव शेळके राहुल निकम आनंदराव मोहिते यांनी उदयनराजे यांना ज्या पैलवानांना बक्षीस मिळाले नाही त्या पैलवानांसाठी काहीतरी करण्यात यावी अशी भावना बोलून दाखवली होती त्या पद्धतीने उदयनराजे मित्र समूहांने या कार्यक्रमाचे आयोजन केले . हिंदकेसरी पृथ्वीराज पाटील उपमहाराष्ट्र केसरी विशाल बनकर यांना उदयन महाराज यांच्या हस्ते रॉयल एनफिल्ड व युनिकॉर्न गाडीच्या चाव्या प्रदान करण्यात आल्या तसेच इतर सात पैलवानांना पंचवीस हजार रुपये सन्मानचिन्ह व गौरव पत्र आले .
यावेळी उपस्थित सर्व पैलवानांनी खासदार उदयनराजे भोसले यांनी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे विशेष आभार मानले तालीम संघाचे अध्यक्ष पैलवान अमर दादा जाधव यांनीसुद्धा उदयनराजे भोसले यांच्या या दातृत्वाचे मनापासून कौतुक केले






