Monday, April 20, 2026
spot_img
Home Politics|Satara District Satara City 13 जून रोजी शाहूकला मंदिर येथे होणार आरक्षण सोडत कार्यक्रम

13 जून रोजी शाहूकला मंदिर येथे होणार आरक्षण सोडत कार्यक्रम

472
Adv

सातारा जिल्ह्यातील सातारा कराड सह इतर सात नगरपालिकांच्या प्रभाग रचना यांचा कार्यक्रम अंतिम झाल्यानंतर आरक्षण सोडतीचा कार्यक्रम ही निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे 13 जून रोजी त्या-त्या नगरपालिकांच्या कार्यक्षेत्रात हा आरक्षण सोडतीचा कार्यक्रम होणार आहे त्यामुळे सातारा जिल्ह्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे

राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे सदस्य पदांच्या आरक्षण सोडतीची नोटीस दहा जून रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. ही नोटीस त्या पालिकेच्या या संकेत स्थळावर प्रसिद्ध करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दिनांक 13 जून रोजी सातारा कराड रहिमतपूर म्हसवड वाई महाबळेश्वर फलटण पाचगणी व मेढा या नगरपालिकांनी 13 जून रोजी उपजिल्हाधिकारी दर्जाच्या सक्षम प्राधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये आरक्षण सोडतीचा कार्यक्रम पार पाडावयाचा आहे .

सातारा पालिकेच्या 25 प्रभागांची आरक्षण सोडत पालिकेच्या शाहू कला मंदिर येथे काढण्यात येणार आहे आरक्षण सोडतीचा कार्यक्रम सकाळी 11 वाजता होणार असल्याचे पालिकेचे प्रशासन व मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी सांगितले

Adv