Friday, April 24, 2026
spot_img
Home Politics|Satara District Satara City *रक्तदान करुन खा श्री छ उदयनराजेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा* *शाहूपुरीतील...

*रक्तदान करुन खा श्री छ उदयनराजेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा* *शाहूपुरीतील महा रक्तदान शिबिरात 127 रक्तदात्यांनी केले रक्तदान*

215
Adv


सातारा : खासदार उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शाहूपुरीत बाळासाहेब गोसावी मित्रसमुह व दुर्गामाता मित्रमंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या महारक्तदान शिबिरात तब्बल 127 रक्तदात्या युवकांनी रक्तदान करुन आपल्या लाडक्या राजाला वाढदिवसाच्या शुभेच्छा व्यक्त सामाजिक बांधिलकीही जपली. या उपक्रमाचे शाहूपुरीवासियांमधून अभिनंदन होत आहे.

खासदार उदयनराजे यांच्या वाढदिवसानिमित्त शाहूपुरीत आयोजित महा रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गेले दोन वर्षे कोरोना महामारीने होरपळलेल्या जनतेला अनेक अडचणी बरोबरच रक्तपेढ्यांमध्ये रक्ताची कमतरता भासत होती. त्यामुळे रक्ताचा तुटवडा भरुन काढण्यासाठी खासदार उदयनराजे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांचे कट्टर समर्थक व माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब गोसावी यांनी पुढाकार घेऊन या महा रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.

खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर अपार प्रेम करणाऱ्या नागरिक व युवक, कार्यकर्त्यांनी या शिबिरात सहभाग घेतला. तब्बल 127 रक्तदात्यांनी रक्तदान केल्याने अनेक रुग्णांना त्याचा लाभ होणार आहे. बुधवारी सकाळी शाहूपुरीतील ज्ञानवर्धिनी शिक्षण संस्थेत या शिबिराचा शुभारंभ बाळासाहेब गोसावी व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. या रक्तदात्यांना बाळासाहेब गोसावी मित्रमंडळ व दुर्गामाता मित्रमंडळातर्फे हेल्मेट व प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात आले. रक्तदानासारख्या महादानातून सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा प्रयत्न नेहमीच दुर्गामाता मित्र मंडळ आणि बाळासाहेब गोसावी यांनी सुरु ठेवला असून या उपक्रमाचे शाहूपुरीवासियांमधून अभिनंदन होत आहे.

महे रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी दुर्गामाता मित्रमंडळाचे अध्यक्ष प्रमोद पाटील, संजय लवळे, मनोज साळुंखे, नितीन गेंजी, किरण पवार, ॲड. शिवप्रसाद वाघमोडे, विकास देशपांडे, हणमंतराव पालेकर, प्रदीप चोरगे, मोहित सपकाळ, अमित महामुने, राहुल शिंगटे, अमोल धनवे तसेच संतोष सापते तसेच पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. शिबिरास दिलेल्या प्रतिसादाबद्दल बाळासाहेब गोसावी यांनी सर्वांचे आभार मानले.

Adv